मलटणमधील एकास पाचजणांकडून दगडाने मारहाण; गुन्हा दाखल

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. ४ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
फलटण येथील विनोद अनिल रणवरे (वय ३०, रा. अष्टविनायक नगर, महतपुरापेठ, मलटण) हे २ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता एका कामाकरिता दुचाकी (एमएच११डीपी७८३०) वरून शुक्रवार पेठेकडे जात असताना त्यांची गाडी अडवून सुमारे पाचजणांनी दगडाने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची व त्यांची गाडीचेही नुकसान केल्याची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या मारहाणीत विनोद रणवरे हे जखमी झाले आहेत.

या प्रकरणी मलटण येथील एकासह इतर चार ते पाच अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक तपास म.पो.हवा. राणी फाळके करत आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!