दैनिक स्थैर्य | दि. २७ फेब्रुवारी २०२४ | मुंबई | विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला नुकतीच मुंबई येथे सुरुवात झाली आहे. विधानसभा कामकाजासाठी तालिका अध्यक्षांची नियुक्ती अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सभागृहात जाहीर केली. विधानसभा तालिका अध्यक्षपदी आमदार दीपक चव्हाण यांनी आज दि. २७ फेब्रुवारी रोजी तालिका अध्यक्ष म्हणून कामकाज पाहिले असून त्यांच्या अध्यक्षतेखाली विविध विधेयके मंजूर करण्यात आली. तर यावेळी विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.