
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. १९ एप्रिल २०२२ । फलटण । आळंदी ते पंढरपूर महामार्गाचे काम सध्या फलटण तालुक्यामध्ये प्रगतीपथावर सुरू आहे. त्यामध्ये तरडगाव येथील असणारा गावाच्या वेशी समोरील पूल अखेर जमीनदोस्त करण्यात आलेला आहे.
शिरवळ ते बारामती या महामार्गावर तरडगाव गावाच्या वेशी समोर भला मोठा पूल उभारण्यात येत होता. परंतु गावकर्यांच्या विरोधामुळे सदरील पूल पूर्णत्वास कधीच गेला नाही. त्यानंतर आता आळंदी पंढरपूर महामार्गाचे काम सुरू असताना अखेर तो पुल जमीनदोस्त करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.
