रोज लँड इंटरनॅशनल स्कूलच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल


दैनिक स्थैर्य । दि. १९ जुलै २०२१ । कुडाळ । पांचगणीतील बहुचर्चित रोज लँड इंटरनॅशनल स्कूलच्या तिघां विरोधात पांचगणी पोलीस ठाण्यात फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल झाले आहे.

याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की फिर्यादी जे. एस. पठाण (वय 60) व्यवसाय सिक्युरिटी एजन्सी रा. 1654 रविवार पेठ एम आय डी सी रोड वाई यांनी दिलेल्या फिर्यादीत अभय जगन्नाथ आगरकर (रा. स्टेशन रोड आगरकर मळा अहमदनगर), सुलतान दुले खान शेख (रा. हरिचंद बेकर्स पाठीमागे अहमदनगर) आणि श्री विद्यामाता एज्युकेशन फोरम जिजा रजिस्टर पत्ता (आगरकर मळा अहमदनगर) या तिघांविरुद्ध रोज लँड इंटरनॅशनल स्कूल सिद्धार्थ नगर पाचगणी शाळेस हॉस्टेलसाठी सिक्युरिटी सेवा पुरवण्यासंदर्भातील व्यवहारात 19 लाख 79 हजार 915 रुपयांची फसवणूक केल्याची खबर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी महाबळेश्‍वर येथे दिली. तशी पाचगणी पोलीस ठाण्यात कागदपत्रे दाखल झाल्याने फसवणुकीचा गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला आहे.
दुसर्‍या गुन्ह्यात फिर्यादी ईर्शाद ताजुद्दीन (रा. डोंगरी, मुंबई) यांनी वरील तिघांविरुद्ध शाळेस हॉस्टेल किराणा मालाचा पुरवठा करण्याकरिता प्रोत्साहित केले तसेच खोटे आमीष दाखवून तीस लाख रुपयेचा भारतीय स्टेट बँकेचा चेक देऊन चेक न वठलेने अगर पैसे परत न दिलेने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी महाबळेश्‍वर येथे खबर दिल्याने आज पाचगणी पोलीस ठाण्यात कागदपत्रे दाखल झाल्याने गुन्हा रजिस्टर नोंद झाला आहे.

पहिल्या तक्रारीत 20 लाख व दुसर्‍या तक्रारीत 30 लाख अशी 50 लाखाची फसवणूक झाल्याचे तक्रारीत दिसत असून अधिक तपास पांचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार, पो. हवलदार पांब्रे व त्यांचे सहकारी करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!