जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघनप्रकरणी गुन्हे दाखल


स्थैर्य, सातारा , दि. १६: कोवीड-19 च्या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्ह्यात प्रशासनाने जारी केलेले आदेश धाब्यावर बसूवन आस्थापना सुरू ठेवणार्‍यांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सातार्‍यातील पोवई नाका येथे इम्तियाज गुलाब शेख रा. कवारे कॉलनी, शाहूपुरी सातारा याने मीन कॉम्पुटर्स अँड हार्डवेअर सुरू ठेवल्याचे दि. 14 रोजी निदर्शनास आले. याप्रकरणी पो. शि. चेतन ठेपणे यांनी कारवाई करत दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार कारळे करीत आहेत.

पंतांचा गोट, सातारा येथे संभाजी महादेव शिंदे रा. गोडोली, सातारा याने दि. 14 रोजी अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश असूनही शिंदे प्लास्टिक नॉयलॉन दुकान सुरू ठेवल्याचे आढळून आले. याप्रकरणी जिल्हा विशेष शाखेचे पो. ना. राहूल खाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आपत्ती व्यवस्थापन गुन्हा कायद्यानुसार दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार कारळे करत आहेत.

त्याचप्रमाणे पोवई नाक्यावरील रविराज स्टिल सेंटर हे दुकान सुरू ठेवणार्‍या अतुल मोहन कुंदक रा. रविवार पेठ, सातारा याच्याविरोधात पो. शि. चेतन ठेपणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार कारळे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!