पेपरफुटी प्रकरणातील आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; राजेंद्र चोरगे यांची आक्रमक मागणी


स्थैर्य, सातारा, दि. ३1 :  नीट (NEET) आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून, या प्रकरणातील आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी आक्रमक मागणी श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी केली आहे.

  • विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा खून: पेपर फोडणे हा लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी आणि मानसिकतेशी खेळ असून, तो एक प्रकारचा देशद्रोहच आहे. या नैराश्यातून काही विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे.

  • आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह: पैसे देऊन किंवा गैरमार्गाने पास झालेले उमेदवार भविष्यात डॉक्टर झाल्यास ते रुग्णांच्या आरोग्याची कितपत काळजी घेतील, असा संतप्त सवाल चोरगे यांनी उपस्थित केला.

  • ५० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे नुकसान: गेल्या वर्षभरात नीट, एमपीएससी, तलाठी आणि पोलिस भरतीसह तब्बल १२ परीक्षा केवळ पेपरफुटीमुळे रद्द झाल्या आहेत.

  • कठोर कायद्याची गरज: शिक्षणमाफियांना मिळणाऱ्या किरकोळ शिक्षेमुळे त्यांचे मनोबल वाढत आहे. त्यामुळे शासनाने कठोर कायदे करून अशा गुन्हेगारांना देशद्रोही घोषित करावे आणि प्रभावी अंमलबजावणी करावी.


Back to top button
Don`t copy text!