स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अण्णांच्या गावचा ‘सरपंच’ होण्यासाठी चढाओढ, यादवबाबांच्या जोडीला पोहोचले श्यामबाबांचे आशीर्वाद

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 9, 2021
in महाराष्ट्र
अण्णांच्या गावचा ‘सरपंच’ होण्यासाठी चढाओढ, यादवबाबांच्या जोडीला पोहोचले श्यामबाबांचे आशीर्वाद
ADVERTISEMENT


स्थैर्य, राळेगणसिद्धी, दि.९: “अनशन’ या एका शब्दाने देशाचे तख्त हलविणाऱ्या अण्णा हजारेंच्या तत्त्वांची त्यांच्या राळेगाव सिद्धीत कसोटी लागली आहे. गावात तंटे नको या भूमिकेतून सुरू झालेल्या अ-विरोध परंपरेला गेल्या दोन निवडणुकींपासून फाटा दिलेल्या राळेगावमध्ये यंदा मापारी आणि औटी एकत्र आले खरे, पण तिसरा पर्याय का नको, असा प्रश्न उपस्थित करीत पठारेंनी त्यांना आव्हान दिले आहे. यादवबाबांच्या आशीर्वादाने सुरू झालेल्या या रणधुमाळीत राजस्थानच्या श्यामबाबांचे आशीर्वाद पोहोचले आहेत.

गावातील पद्मावती मंदिराच्या परिसरातील लाइव्ह शोची सुरुवात जयसिंगराव मापारींच्या प्रतिक्रियेने झाली. त्रेपन्न वर्षांचे जयसिंगराव मापारी राळेगणचे तीन वेळा उपसरपंंच आणि एकदा सरपंच झाले होते. गेल्या वेळी त्यांच्याविरोधात लढलेले लाभेश औटी यावेळी मापारींसोबत आहेत. दोघांनी अण्णांचा आशीर्वाद घेऊन राळेगण सिद्धीत अ-विरोध निवडणुकीची घोषणा केली खरी पण किसनराव पठारेंनी “तिसरा पर्याय का नको?’ असा प्रश्न उपस्थित करीत त्यात खोडा घातला. शेवटी दोन जागांवर अविरोध निवड झाली आहे तर सात जागांसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होत आहे. “अण्णांच्या गावचे सरपंच बनणे असे प्रत्येकालाच वाटते’, जयसिंगराव सांगत होते. गेल्यावेळी त्यांच्या विरोधात लढलेले लाभेश औटी गावचा विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी उभारलेला सोलर प्रकल्प, राज्यातील पहिला पुनर्भरण प्रकल्प या झालेल्या विकासकामांची माहिती देत होते. सेंद्रिय शेतीउद्योगातील अग्रणी गाव म्हणून राळेगणचे भविष्य घडविण्याचे स्वप्न मांडत होते. त्यांच्याविरोधात उमेदवारी करणारे किसनराव पठारे मात्र त्या चर्चेत सहभागी झाले नव्हते. गावाच्या वेशीतून किसनरावांची गाडी वळली तेव्हा कुणीतरी “भावी सरपंच’ म्हणून त्यांची गंमतही केली. निवडणुकीसाठी गावात दोन गट झाले असले तरी निवडणूक काळात आणि नंतरही गावातील एकोपा टिकवून ठेवण्याचे आव्हान असल्याचे शरद मापारी सांगत होते. त्यांची पत्नी निवडणुकीच्या रिंगणात आहे.

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

जय श्री श्यामबाबांचा आशीर्वाद!
राळेगणचे यादवबाबा मंदिर हे अण्णा हजारेंसह संपूर्ण गावाचे श्रद्धास्थान. यादवबाबांच्या मंदिरातच मुक्काम करणाऱ्या अण्णांनी आयुष्यभर यादवबाबांचे दर्शन घेऊन आंदोलने केली, उपोषणे केली. या वेळी निवडणुकीत उतरलेेल्या किसन पठारे यांनी थेट राजस्थानहून श्री श्यामबाबांची प्रतिमा मागवली आहे. आपल्या पॅनललाही त्यांनी श्यामबाबांचे नाव दिले आहे. अण्णांच्याच आशीर्वादाने आपणही निवडणूक लढवत असल्याचे त्यांनीही सांगितले.

महिलांची पंचायत आणि पुरुषांचा कारभार
पंचायतराज व्यवस्थेने महिलांना ५० टक्के आरक्षण दिले तरी सार्वजनिक-राजकीय अवकाशात ५० टक्के वाटा मिळविण्याचा महिलांचा संघर्ष आजही घराघरात सुरू आहे. “अण्णांचे गाव’ही यास अपवाद नाही. गेल्या वेळी सर्व जागांवर महिलांना उभे करून राळेगणने संपूर्ण “महिला पंचायती’चा विक्रम नोंदवला, पण अन्य गावांप्रमाणेच प्रत्यक्ष राजकारण आणि कामकाज पुरुषांच्याच हातात असल्याचे दिसले.
निवडणुकीसाठी चाललेल्या टीव्ही शोमध्ये अनेक ग्रामस्थ हिरिरीने बोलत होते, त्यात महिला मात्र एकही नव्हती!

…पण आता निवडणुकीत पथ्ये पाळावीत
सर्व तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींची निवडणूक अविरोध व्हावी अशी माझी अपेक्षा होती, आमच्या आमदारांनीही तसे आवाहन केले होते. त्यामुळे मतभेद होत नाहीत, भांडणतंटे होत नाहीत. माझी पहिली पसंती ग्रामसभेने सदस्य निवडावेत याला आहे. ते न झाल्यास, निवडणूक झालीच तर तेथेे दंगा, दारू, जेवणावळी, भांडणे होऊ नयेत, आमिष नसावे अशी माझी इच्छा आहे, त्याप्रमाणे ही निवडणूक होईल असे मला ग्रामस्थांनी आश्वासन दिले आहे. – अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ADVERTISEMENT
Previous Post

91 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित

Next Post

भंडारा जिल्हा रुग्णालयात 10 नवजातांचा मृत्यू, 7 बालकांना वाचवले

Next Post
भंडारा जिल्हा रुग्णालयात 10 नवजातांचा मृत्यू, 7 बालकांना वाचवले

भंडारा जिल्हा रुग्णालयात 10 नवजातांचा मृत्यू, 7 बालकांना वाचवले

ताज्या बातम्या

लाल किल्ला परिसरातील उपद्रवानंतर अनेक भागातील इंटरनेट बंद, गृहमंत्री अमित शाहांनी बोलावली आपत्कालीन बैठक

लाल किल्ला परिसरातील उपद्रवानंतर अनेक भागातील इंटरनेट बंद, गृहमंत्री अमित शाहांनी बोलावली आपत्कालीन बैठक

January 26, 2021
‘हमाम मे सब नंगे है’ याचे भान विरोधी पक्षाने ठेवावे; संजय राऊत यांचा भाजपला टोला

बुलेट ट्रेन दिल्यामुळे केंद्र सरकारने जपानच्या माजी पंतप्रधानांना पुरस्कार दिला असावा; शिवसेना खासदार संजय राऊतांची टीका

January 26, 2021
शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर खलिस्तानचा झेंडा फडकवला; ITO जवळ ट्रॅक्टर पलटल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू

शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर खलिस्तानचा झेंडा फडकवला; ITO जवळ ट्रॅक्टर पलटल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू

January 26, 2021
प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये राफेलने प्रथमच उड्डाण केले

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये राफेलने प्रथमच उड्डाण केले

January 26, 2021
जलसिंचन चा मनमानी कारभार शेतकऱ्यांच्या मुळावर; कोयनेत विजेचाही लपंडाव

जलसिंचन चा मनमानी कारभार शेतकऱ्यांच्या मुळावर; कोयनेत विजेचाही लपंडाव

January 26, 2021
आमच्या हक्काचं न मिळाल्यास पुन्हा येऊ; साता-यात आत्मदहनकर्त्यांचा इशारा

आमच्या हक्काचं न मिळाल्यास पुन्हा येऊ; साता-यात आत्मदहनकर्त्यांचा इशारा

January 26, 2021
निपाणीच्या पोरीनं जिंकलं दिल्लीचं तख्त; सुप्रियाची सैन्य दलात फिनिक्स भरारी

निपाणीच्या पोरीनं जिंकलं दिल्लीचं तख्त; सुप्रियाची सैन्य दलात फिनिक्स भरारी

January 26, 2021
मतदानकार्डची PDF कॉपी डाउनलोड करता येणार, जुन्या मतदारांसाठी ही सुविधा 1 फेब्रुवारीपासून होणार सुरू

मतदानकार्डची PDF कॉपी डाउनलोड करता येणार, जुन्या मतदारांसाठी ही सुविधा 1 फेब्रुवारीपासून होणार सुरू

January 26, 2021
विश्वास नागरे पाटील म्हणाले – ‘मोर्चाला परवानगी नाही, तरीही मोर्चा काढल्यास त्यांना रोखले जाईल’

विश्वास नागरे पाटील म्हणाले – ‘मोर्चाला परवानगी नाही, तरीही मोर्चा काढल्यास त्यांना रोखले जाईल’

January 26, 2021
ऍमेझॉन, फ्लिपकार्टसह ई-कॉमर्स कंपन्यांवर व्यापारी संघटनांचा चक्क दरोड्याचा आरोप!

ऍमेझॉन, फ्लिपकार्टसह ई-कॉमर्स कंपन्यांवर व्यापारी संघटनांचा चक्क दरोड्याचा आरोप!

January 26, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.