पन्नास लाखांच्या बनावट नोटा जप्त; कऱ्हाडला 20 वर्षांत 5 टोळ्यांतील 25 जणांना अटक


 

स्थैर्य, कऱ्हाड (जि. सातारा), दि.१९ : जिल्ह्यातील कऱ्हाड ही सर्वात मोठी उलाढालीची बाजारपेठ. या बाजरपेठेत 20 वर्षांत तब्बल 50 लाखांच्या बनावट नोटा खपवण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी प्रत्येक वेळी हे प्रयत्न हानून पाडत बनावट नोटा विकणाऱ्या 25 संशयितांना गजाआड केले आहे. त्यात सांगली जिल्ह्यासह इंचलकरंजी, रेंदाळचे कनेक्‍शन आहे. त्याद्वारे कर्नाटकपर्यंतही धागेदोरे जातात. त्यामुळे गजाआड होणाऱ्या टोळीच्या तपासाला पोलिसांपुढे मर्यादा व आव्हान येताना दिसते. 

सुमारे 20 वर्षांपूर्वी दोन लाखांच्या बनावट नोटांसह नऊ संशयित अटक झाले. त्यातील दोन कऱ्हाडचे, तर अन्य तिघे सांगली व दोघे कर्नाटकातील होते. 2003 मध्ये 13 जणांना अटक करून त्यांच्याकडून सात लाख 50 हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या. युवा नेत्यासह दोन महिलांनाही अटक झाली होती. 2005 मध्ये नऊ जणांना अटक करत त्यांच्याकडून दोन लाखांच्या बनावट नोटा जप्त झाल्या. 2003 व 2005 मध्ये अटक झालेल्यांचा टोळ्यांचा सूत्रधार एकच होता. जामिनावर बाहेर आल्यावर तो पुन्हा बनावट नोटात सक्रिय होत त्याने नवीन टोळी केली होती. नोटात वापरल्या जाणाऱ्या महात्मा गांधींच्या फोटोचा संशयितांनी केलेल्या “वॉटर मार्क’ने पोलिसही चक्रावले होते. सर्वात मोठी कारवाई 2014 मध्ये झाली. त्यातही 2003 व 205 मधील संशयिताला तब्बल 29 लाखांच्या बनावट नोटांसह अटक झाली. त्या दोघांनीच नोटा तयार केल्याची कबुली दिली होती. त्यामुळे तो तपास पुढे सरकला नाही.

अबब.. दहा फुटी मगर येरळवाडी नदीपात्रात; नागरिकांचा उडाला थरकाप

त्यापूर्वी 2012 मध्ये वेगवेगळ्या कारवायांत तब्बल दोन लाख 50 हजारांच्या बनावट नोटा जप्त झाल्या. त्यात चौघांना अटक होती. त्यानंतर अंबवडे येथे एलसीबीने केलेल्या कारवाई दोन लाख 94 हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. 20 वर्षांत कारवाई करताना पोलिसांनी तब्बल 50 लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. मात्र, त्या टोळ्यांनी तितक्‍याच नोटा अटक होण्यापूर्वी खपवल्याचीही भीती आहे. 

रकमेच्या दुप्पट किमतीच्या नोटा : बनावट नोटा खपविणारे खऱ्या नोटा जेवढ्या देतील त्याच्या दुप्पट बनावट नोटा त्यांना दिल्या जातात. म्हणजे 50 हजार दिले, की एक लाखाच्या बनावट नोटा खपविण्यासाठी दिल्या जातात. हा व्यवहार रूढ आहे. दुप्पट पैसे मिळवण्यासाठी नोटा खपविण्याच्या व्यवसायाकडे युवक वळत आहे. आतापर्यंत अटक झालेले संशयित चाळीशीतील आहेत. त्यामुळे “शॉर्टकट’चा मोह त्यांना धोक्‍याचा ठरतो आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!