राजाळे येथील हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात महिला, विद्यार्थिनींचा सत्कार


दैनिक स्थैर्य | दि. ८ मार्च २०२३ | फलटण |
जागतिक महिला दिनानिमित्त राजाळे येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या श्री जानाई हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात उपस्थित महिला, विद्यार्थिनी व शिक्षिकांचा सन्मान विद्यालयाचे प्राचार्य श्री. नेरकर सर व पर्यवेक्षक श्री. गावडे सर यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन करण्यात आला.

याप्रसंगी श्री जानाई हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. निंबाळकर सर यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!