
थेट WhatsApp वर मिळवा
अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) उघड्यावर आणि विनापरवाना हळद-मिरची पावडरसह इतर मसाले विकणाऱ्यांवर कडक कारवाई करत अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना मोठा इशारा दिला आहे.
स्थैर्य, सातारा, दि. १६ ऑक्टोबर : राज्यातील अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी आणि नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षितता टिकवण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडून (FDA) विशेष मोहीम राबवली जात आहे. यादरम्यान कोणतीही कायदेशीर परवानगी किंवा परवाना न घेता उघड्यावर मसाले विकणाऱ्या व्यावसायिकांवर प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत.
नियमभंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा
अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याचे उल्लंघन करून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर अन्न आणि औषध प्रशासनाकडून दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. भेसळयुक्त मसाले आणि निकृष्ट दर्जाच्या उत्पादनांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम रोखण्यासाठी ही मोहीम राज्यभर तीव्र करण्यात आली असून अन्न व्यावसायिकांनी परवाना व नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





