बाबा जीवनी आधार; प्रिय आबा Team Sthairyaजून 20, 2021Last Updated: जून 20, 2021 दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या थेट WhatsApp वर मिळवाWhatsApp Channel JOIN करा ›वडील मायेची सावली जिच्या सावलीत वाढलो खेळलो,रडलो कितीदा शिकवणीत त्यांच्या घडलोवडील असे आमचे आबा खाऊन शिळी भाकरी प्रामाणिकपणे केली पोलिस खात्यात चाकरीतुटपुंज्या पगारात संसार गाडा चालविला कामावरून येताना खाऊ आमच्या साठी आणिलामुलींना उच्च शिक्षित करुनी फुलांसमान वाढविले मुलगा मुलगी ना मानिला भेद उत्तम माणूस घडविलेकरुनी मुलींची लग्न पार पाडली कर्तव्य ज्यांनी अजूनही करतात खुप नात्यांसह माणुसकी जपली त्यांनीपंच्याहत्तरी साजरी केली ऐंशीत आनंद मिळो तुम्हा नवनवा मिळो शतायुष्य तुम्हा बाबा जीवनी आधार तुमचा हवावडील रुपी झर्याचे पाणी कधीही संपत नाही त्यांच्या उपकार,कर्तव्याचे ॠण कधीही फेडता येत नाही येणार नाहीप्रतिभा मधुकर जाधव फलटण, सातारा. ८८०५०९१०७६ Team Sthairyaजून 20, 2021Last Updated: जून 20, 2021 Facebook X WhatsApp Telegram