कृषीकन्यांनी सांगितले योग दिनाचे महत्त्व

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २२ जून २०२४ | फलटण |
‘आंतरराष्ट्रीय योग दिना’चे औचित्य साधत वडजल, ता. फलटण येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचे संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी संचालित कृषी महाविद्यालय फलटणमधील चतुर्थ वर्षातील विद्यार्थिनींनी योग दिनानिमित्त माहिती सांगितली. शाळांमध्ये शुक्रवारी सकाळी मोठ्या उत्साहाने योग दिन साजरा केला. शिक्षकांनी व कृषीकन्यांनी योग दिनाचे महत्व विषद करून सांगितले व विविध सूर्यनमस्कार, ध्यान, योगासने, प्रार्थना इ. घेण्यात आली.

जागतिक योग दिनानिमित जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडजल येथील शाळेत सकाळी अतिशय आनंददायी वातावरणामध्ये शिक्षक व कृषीकन्या ज्ञानेश्वरी जाधव, जगताप धनश्री, जगताप प्राजक्ता, धुमाळ सई, शुभांगी गावडे, गायकवाड श्रेया, ऐश्वर्या गिरमे, खिलारे सुप्रिया यांच्यासमवेत विद्यार्थ्यांनी योग दिन साजरा केला. त्यावेळेस शाळा मुख्याध्यापिका मंदा थोरात व प्राध्यापिका अडागळे शांताबाई, सोनवणे शीतल उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे व प्रा. नितीशा पंडित, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे यांचे विद्यार्थिनींना मार्गदर्शन लाभले.


Back to top button
Don`t copy text!