धुळदेव येथील कृषीकन्यांनी घेतली बीजामृत बनविण्याबाबत कार्यशाळा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २६ जानेवारी २०२४ | फलटण |
फलटण तालुक्यातील धुळदेव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीकन्यांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२०२४ कार्यक्रमाअंतर्गत ‘बिजामृत कसे बनवावे व त्याचे फायदे’ या विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती.

या कार्यशाळेत आवश्यक साहित्य, बीजामृत बनविण्याची शास्त्रीय पद्धत तसेच बीजामृताचे उपयोग समजावून सांगितले. बिजामृत हे एक पारंपरिक जैविक बीजसंस्कार असून यामुळे पिकांची होणारी निरोगी वाढ जोमदार होते. रोगप्रतिकारक क्षमता, सहनशीलता वाढते. शेतामधील मातीतील चांगल्या बॅक्टेरियांची उपज वाढवायला याचा उपयोग होतो.पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता पण वाढते, असे अनेक फायदे कृषीकन्यांनी तकत्याच्या मदतीने स्पष्ट केले.

कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वय प्रा. नीलीमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे सर व प्रा. नितिशा पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीकन्या सिद्धी शेटे, साक्षी जाधव, समृध्दी जगताप, सिद्धिका कांबळे, स्वेजल पाटील, प्रियांका शिंदे, प्रियांका भोसले, श्वेता सस्ते यांनी ही कार्यशाळा उत्कृष्टरित्या पार पाडली. या कार्यशाळेस शेतकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


Back to top button
Don`t copy text!