
थेट WhatsApp वर मिळवा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत राज्य सरकारने पात्र शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर केली असून, या नव्या यादीत राज्यातील ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
स्थैर्य, सातारा, दि. १५ ऑक्टोबर : राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्यात आली आहे. शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या तिसऱ्या यादीमुळे लाखो शेतकऱ्यांवरील कर्जाचे ओझे कमी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पात्र शेतकऱ्यांसाठी आवश्यक प्रक्रिया
या योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाच्या थकबाकीची खातरजमा करून जवळच्या आपले सेवा केंद्रात किंवा अधिकृत केंद्रावर आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच कर्जमाफीची संबंधित रक्कम थेट पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात किंवा कर्जखात्यात जमा केली जाणार आहे, अशी माहिती प्रशासकीय यंत्रणेकडून देण्यात आली आहे.





