
दैनिक स्थैर्य । दि.२५ मार्च २०२२ । मुंबई । शिक्षणाधिकारी, उप शिक्षणाधिकारी व तत्सम संवर्गासाठी सेवाप्रवेश नियमानुसार कोणत्याही शाखेतील पदवी ही अर्हता निश्चित केलेली आहे. बी.एड,, एम.एड हे पदवी उत्तीर्ण असल्यामुळे त्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा अन्य स्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेस बसता येईल, अशी माहिती ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ व ब या संवर्गातील शिक्षणाधिकारी व तत्सम वर्ग 1 आणि उपजिल्हाधिकारी व तत्सम वर्ग 2 संवर्गाकरिता शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सेवाप्रवेशात सुधारणा केली आहे. या सुधारणेनुसार शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी पदाच्या सरळसेवा प्रवेशाकरिता विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवी किंवा त्यास समतुल्य अर्हता धारण केलेल्या उमेदवारास पात्र ठरविण्याची तरतूद असल्याचेही राज्यमंत्री श्री.सत्तार यांनी सांगितले.
या संदर्भातील प्रश्न विधान परिषद सदस्य सर्वश्री सुरेश धस, विक्रम काळे यांनी उपस्थित केला होता.