दैनिक स्थैर्य | दि. २४ जानेवारी २०२४ | फलटण |
फलटण तालुक्यातील सोनगाव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषिकन्यांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२०२४ कार्यक्रमाअंतर्गत ‘सहभागी ग्रामीण मूल्यांकन’ हा कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पडला.
कृषीकन्या हर्षल भालघरे, प्रितल भोसले, प्रेरणा खोपडे, वैष्णवी पिसाळ, भाग्यश्री राऊत, नेहा साळुंखे, नंदिनी शिंदे यांनी या कार्यक्रमाअंतर्गत सोनगाव गावच्या नकाशाचा अभ्यास करून त्याची प्रतिकृती गावच्या ग्रामस्थांसमोर सादर केली. या कार्यक्रमाअंतर्गत ग्रामस्थ व कृषीकन्या यांच्यात गावच्या नकाशाबद्दलच्या माहितीची देवाणघेवाण झाली. ग्रामस्थांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वय प्रा. निलीमा धालपे मॅडम, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे सर व प्रा. नितिशा पंडित मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.