फलटण तालुका शिक्षक समितीची कार्यकारणी जाहीर

अध्यक्षपदी गणेश तांबे व सरचिटणीसपदी संतोष मोहिते


दैनिक स्थैर्य | दि. २४ जानेवारी २०२४ | फलटण |
फलटण तालुका शिक्षक समितीच्या आज झालेल्या सहविचार सभेत नूतन कार्यकारिणी बहुसंख्य सभासदांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. यामध्ये श्री. गणेश तांबे यांची अध्यक्षपदी व श्री. संतोष मोहिते यांची सरचिटणीसपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

श्री. संजय जाधव – शिक्षक नेते, श्री. नितीन करे – तालुका नेते, श्री. अंकुश लोखंडे – कार्याध्यक्ष, श्री. बाळकृष्ण गायकवाड – कोषाध्यक्ष इ. निवडी जाहीर करण्यात आल्या असून लवकरच फलटण तालुक्यात सर्व शिक्षक समितीच्या कार्यकर्त्यांचा भव्यदिव्य मेळावा घेऊन उर्वरित कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे. शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असणारी फलटण तालुका शिक्षक समिती कार्य करत आहे.

फलटण तालुका शिक्षक समितीच्या नूतन पदाधिकार्‍यांचे जिल्हा नेते श्री. सुरेंद्रकुमार घाडगे, श्री. चंद्रकांत मोरे, श्री. उदयकुमार नाळे तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. सिध्दनाथ देशमुख, सातारा जिल्हा शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष श्री. शशिकांत बागल, जिल्हा सरचिटणीस श्री. आनंदराव सोनवलकर, सल्लागार श्री. संपतराव मराठे, सहचिटणीस श्री. संपतराव निकाळजे, कोषाध्यक्ष श्री. धन्यकुमार तारळकर, उपाध्यक्ष श्री. अमोल निकाळजे, संपर्कप्रमुख श्री. आबा देशमुख व सातारा जिल्हा शिक्षक समितीच्या सर्व सभासदांनी अभिनंदन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!