ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून फलटणमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांना विनम्र अभिवादन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी फलटण येथील महात्मा फुले चौकात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

स्थैर्य, फलटण, दि. 11 एप्रिल : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आज फलटण येथील महात्मा फुले चौकात भेट दिली. यावेळी त्यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या महान सामाजिक कार्याचे स्मरण करत त्यांना भावपूर्ण व विनम्र अभिवादन केले.

या अभिवादनप्रसंगी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत फलटण-कोरेगाव मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील, फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच, या कार्यक्रमासाठी शहरातील अनेक नगरसेवक, नगरसेविका आणि फलटण शहरासह तालुक्यातील विविध राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांतील मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित सर्व मान्यवरांनी यावेळी महात्मा फुले यांच्या समतेच्या आणि सत्यशोधक विचारांना उजाळा दिला.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!