स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

ईव्हीट्रीक मोटर्सने इलेक्ट्रिक मोटरसायकल राईझ लॉन्च केली

एक्स-शोरूम १,५९,९९० दरासह शुभारंभ

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
June 23, 2022
in इतर

दैनिक स्थैर्य । दि. २३ जून २०२२ । मुंबई । ईव्हीट्रीक मोटर्स ह्या पुण्यातील पीएपीएल इलेक्ट्रिक वाहनांच्या व्हेंचरने ईव्हीट्रीक राईझ ह्या इलेक्ट्रिक मोटरसायकलचा शुभारंभ केला. ही उच्च वेगाची मोटरसायकल ह्या ब्रँडची पहिली आकर्षक आणि रुबाबदार शैलीची व अतिशय अद्ययावत तंत्रज्ञान असलेली इलेक्ट्रिक मोटरसायकल आहे. ईव्हीट्रीक मोटर्सच्या टीमने सिकर, राजस्थान येथील वितरकांच्या बैठकीमध्ये ह्या उत्पादनाची घोषणा रू. १,५९,९९० (भारतातील एक्स- शोरूम) ह्या दराने केली. पूर्ण राजस्थानमधील वितरक भागीदारांनी ह्या बैठकीत सहभाग घेतला आणि ब्रँडच्या ह्या नवीन उत्पादनाच्या शुभारंभाचे ते साक्षीदार बनले.

हा ब्रँड इलेक्ट्रिक वाहन सेग्मेंटमध्ये ‘मेक इन इंडिया’ ह्या सर्वोच्च व्हिजनला चालना देत आहे. बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक बाईक ईव्हीट्रीक राईझमध्ये ७० किमी/ प्रति तास ही सर्वोच्च गती असेल व एका चार्जवर ती सहजपणे ११० किलोमीटर इतके अंतर पार करेल. तिच्यामध्ये लिथियम आयनची बॅटरी आहे व ती ४ तासांमध्ये पूर्ण चार्ज होते. ऑटो कट फीचरसह येणा-या १० एएमपी मायक्रो चार्जरसह युजर्सना ह्या बाईसची बॅटरी चार्ज करणे सोपे आणि सुरक्षित आहे.

त्यामध्ये रुबाबदार स्पोर्टी लूक आहे व बाजूंवर शार्प कटस दिलेले आहेत. त्यामध्ये एलईडी व दिवसाचे लाईट फंक्शन दिले गेलेले आहे. त्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण रिअर विंकर्सही आहेत व त्याद्वारे युजर्सना अद्ययावत वैशिष्ट्यांचा लाभ मिळतो. राईझला २००० वॉट बीएलडीसी मोटर जोडलेली आहे व तिची ७०v/४०ah लिथियम आयन बॅटरी आहे. ही नवी बाईक आकर्षक लाल व काळ्या रंगात उपलब्ध आहे व ही बाकी दैनंदिन प्रवासामध्ये एक रुबाबदार सुविधा मिळवून देते.

- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -

टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज

ईव्हीट्रीक मोटर्सचे संस्थापक आणि एमडी श्री. मनोज पाटील ह्यांनी म्हंटले, “आमच्या अद्ययावत क्रिएशन असलेल्या राईजला आणि आमच्या पहिल्या ‘मेक इन इंडिया’ इलेक्ट्रिक बाईकला सादर करताना आम्हांला आनंद होत आहे. आयसीईकडून ईव्हीकडे स्विच करण्याबद्दल अजूनही निश्चिंत नसलेल्या ग्राहकांसाठी ही बाईक निश्चितच सत्य गुणवत्तेचा अनुभव मिळवून देईल. आम्हांला विश्वास आहे की, सर्वोच्च ई-मोबिलिटी मिशनला सर्वोत्तम योगदान देणे आणि मार्केटच्या प्रगतीमध्ये भर घालणे आणि प्रदूषण विरहित भविष्याला चालना देणे, ही भारतीय ऑटोमेकर्सची जवाबदारी आहे. अनेक वर्षांच्या ऑटोमेशनमधील आमच्या अनुभवाच्या आधारे आम्ही आमचे दायित्व पार पाडण्यासाठी सुसज्ज आहोत. आणि नवीन ईव्हीट्रीक राईझ ही त्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे.”

पेट्रोल ते इलेक्ट्रिक वाहनांच्या दिशेने बदल अनुभवत असलेल्या भारतीय युजर्सना उत्तम गुणवत्तेच्या इलेक्ट्रिक वाहनांची सेवा देण्यासाठी हा ब्रँड सलग भारतात बनलेल्या उत्पादनांचा शुभारंभ करत आहे. सध्या, ब्रँडकडे आधीच 3 इलेक्ट्रिक स्कूटर्स रस्त्यावर वापरात आलेल्या आहेत- ईव्हीट्रीक एक्सिस, ईव्हीट्रीक राईड आणि ईव्हीट्रीक मायटी आणि कंपनीचे भारतातील २२ राज्यांमध्ये १२५ टचपॉईंटस आहेत.

Related


Previous Post

उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडून जागतिक ऑलिम्पिक दिनाच्या शुभेच्छा

Next Post

प्रवचने – ज्ञान हे दुहेरी शस्त्र आहे

Next Post

प्रवचने - ज्ञान हे दुहेरी शस्त्र आहे

ताज्या बातम्या

फलटण नगरपरिषदेची प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी जाहीर

July 6, 2022

‘दिलखुलास’ कार्यक्रमात पावसाळ्यातील आजारांविषयी डॉ. पल्लवी सापळे यांची मुलाखत

July 6, 2022

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रेशीमबाग स्मृती मंदिराला भेट

July 6, 2022

कारागृहाबाहेर वास्तव्य करणाऱ्या एकावर गुन्हा

July 6, 2022

अल्पवयीन मुलीस पळवले

July 6, 2022

खिंडवाडी येथे एकाला मारहाण पाच जणांवर गुन्हा

July 6, 2022

मारहाण केल्याप्रकरणी तिघाजणांवर गुन्हा

July 6, 2022

साताऱ्यातून दोन दुचाकींची चोरी

July 6, 2022

दारुच्या नशेत पडून एकाचा मृत्यू

July 6, 2022

विषारी औषध प्राशन केलेल्या युवतीचा मृत्यू

July 6, 2022
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!