प्रत्येक भारतीयाने तिरंग्याची शान राखली पाहिजे – प्रा. डॉ.प्रभाकर पवार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. ११ ऑगस्ट २०२२ । फलटण । महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ,कामगार कल्याण केंद्र सातारा यांच्या वतीने स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त ‘घर-घर तिरंगा’या कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम बाजार फलटण येथे करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री.अनंत पाटील जनरल मॅनेजर,प्रमुख व्याख्याते म्हणून मुधोजी महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख व श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेचे विद्यमान संचालक माननीय प्रा.डॉ.प्रभाकर पवार सर यांनी घर घर तिरंगा यावर अभूतपूर्व पद्धतीने मार्गदर्शन केले. घर घर तिरंगा या विषयी मार्गदर्शन करताना करताना डॉ. प्रभाकर पवार सर यांनी आपल्या राष्ट्रध्वजाचे महत्व अतिशय प्रभावी पद्धतीने सांगितले. त्यांचे काही विचार असे होते.आपण आपल्या राष्ट्रध्वजाची अस्मिता आपल्या हृदयाप्रमाणे जोपासली पाहिजे जेणकरून आपली पुढील पिढी देखील त्याचे महत्व समजेल. कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पार पडला.कार्यक्रमास कामगार वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक स्वागत व आभार श्री संदीप कांबळे केंद्र संचालक कामगार कल्याण केंद्र सातारा यांनी केले. कार्यक्रमास कामगार कल्याण केंद्र कर्मचारी वर्गणी सहकार्य केले त्यामध्ये श्री सोमनाथ चोरगे, सौ सुजाता जाधव, सौ.तृप्ती निकम,सौ.जयश्री साळुंखे, सौ.ज्योती मोरे या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Back to top button
Don`t copy text!