दैनिक स्थैर्य । ११ मार्च २०२३ । आटपाडी । कला व विज्ञान महाविद्यालय, आटपाडी मध्ये सेंद्रिय शेती- काळाची गरज या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत राबविलेल्या अग्रणी योजने अंतर्गत कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये खास विद्यार्थ्यांच्या बौद्धिक वाढ व विकासासाठी नवनवीन उपक्रम त्यामध्ये सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक इत्यादी मध्ये झालेल्या बदलांची माहिती होण्यासाठी राबविले जातात.याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून सेंद्रिय शेती – काळाची गरज या विषयावर श्री रावसाहेब रामराव पाटील महाविद्यालय, (प्रमुख अग्रणी महाविद्यालय) सावळज व कला व विज्ञान महाविद्यालय ,आटपाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 04 /03/ 2023 रोजी सकाळी 9.00 वाजता एक दिवसीय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी .श्री प्रशांत पाटील व्यवस्थापक (आत्मा) तालुका कृषी अधिकारी आटपाडी यांनी सेंद्रिय शेती काळाची गरज या बद्दल मार्गदर्शन केले व प्रत्येक घरात परसबाग असावी असे मत व्यक्त केले. कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील अध्यक्षस्थानी होते.दुर्धर आजारांपासून संरक्षणासाठी सेंद्रिय शेती अतिशय आवश्यक आहे असे मत त्यांनी अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले. या कार्यशाळेचा लाभ अग्रणी योजनेअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थी -विद्यार्थिनींनी घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख प्रा.बालाजी वाघमोडे यांनी केले. प्रास्ताविक अग्रणी कार्यशाळा समन्वयक प्रा.डॉ भारती देशमुखे यांनी केले व आभार प्रा.डॉ. बाळासाहेब कदम यांनी मानले. यावेळी प्रा.संतोष सावंत ,प्रा.सचिन सरक, प्रा.सारिका घाडगे,प्रा.माधुरी मोरे, प्रा.भगत, श्री.विश्वेश्वर खंदारे ,श्री.सर्जेराव पाटील उपस्थित होते.