श्रीमंत रामराजेंच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त फलटणमध्ये हिंदी आणि मराठी गीतांचा सदाबहार कार्यक्रम

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. ०७ जानेवारी २०२३ । फलटण । विधानपरिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त कोल्हापूर येथील स्वरतरंग संगीत प्रेमी मंच यांचा कराओके आधारित हिंदी आणि मराठी गीतांचा सदाबहार कार्यक्रमाचे
“जो तुमको हो पसंद” आयोजन करण्यात आले आहे.

प्रवेश मोफत असून, आपली तारीख आणि वेळ राखून ठेवा आणि आवर्जून या. स्वरतरंग संगीत प्रेमी मंच यांची सुरेल गाणी ऐकण्यासाठी आम्ही आपली वाट पहात आहोत. फलटण येथील सजाई गार्डन, जाधववाडी येथे दि. 08 जानेवारी 2023 रोजी संध्या. 05 वाजता कार्यक्रम संपन्न होणार आहे.

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया फलटण सेंटर, लायन्स क्लब ऑफ फलटण, क्रेडाई फलटण, जायंट्स ग्रुप ऑफ फलटण, रोटरी क्लब ऑफ फलटण, क्रेडाई (वूमेन्स विंग), लायन्स क्लब प्लॅटिनम, लायन्स क्लब गोल्डन, लिओ क्लब, इको क्लब, युथ विंग व BAI वूमेन्स विंग यांच्या सौजन्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Back to top button
Don`t copy text!