स्थैर्य, मुंबई,२८ : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोना प्रादुर्भावात वाढ होत असून आजही कोरोना रुगणांची संख्या 6 हजारांपेक्षा जास्त आढळून आली आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये घट झाली आहे.
महाराष्ट्रात आज 4 हजार 89 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यात आजपर्यंत एकूण 16 लाख 72 हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 92.48 टक्के एवढे झालं आहे. आज राज्यात 6 हजार 185 नवीन रुग्णांचे निदान झाले.
कोरोनाबाबत आज नेमकी कशी राहिली स्थिती?
– राज्यात आज 85 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद
– सध्या राज्यातील मृत्यूदर 2.59 टक्के एवढा आहे
– आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 35 लाखाहून अधिक प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 18 लाख 8 हजार 550 (17टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
– सध्या राज्यात 5 लाखांहून अधिक व्यक्ती होम क्वारन्टाईनमध्ये आहेत तर 7 हजाराहून अधिक व्यक्ती संस्थात्मक क्वारन्टाईनमध्ये आहेत.
– राज्यातील ऍक्टिव्ह रुग्ण – राज्यात आज रोजी एकूण 87 हजार 969 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
धक्कादायक! आजी आजोबासमोरचं १० वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला
दरम्यान, मुंबई आणि पुण्यासह राज्यातील ग्रामीण भागातही दिवाळीनंतर कोरोना संसर्ग वाढीस लागला आहे. दिवाळीच्या काळात अनेक नागरिकांनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास केला. तसंच खरेदीसाठी बाजारपेठांमध्येही चांगलीच गर्दी झाली होती. परिणामी आता राज्यात कोरोनाबाधितांचे आकडे वाढताना दिसत आहेत. त्यामुळे यापुढील काळात तरी नागरिकांनी कोरोनाबाबत खबरदारी घेण्याचं आवाहन शासन-प्रशासनाकडून करण्यात येत आहे.