धक्कादायक! आजी आजोबासमोरचं १० वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, बीड, दि.२७: बीड जिल्ह्यात (beed district) काही दिवसांपूर्वी
बिबट्याने चढवलेल्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू (farmer death)
झाल्याची घटना समोर आली होती. दरम्यान पुन्हा बिबट्याने (Leopards attack)
शेतात गेलेल्या १० वर्षीय मुलावर हल्ला चढवला असून, बिबट्याच्या हल्ल्यात
१० वर्षीय मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी साडे बाराच्या
सुमारास आष्टी तालुक्यातील (ashti taluka) किन्ही येथे घडली आहे. काही
दिवसांपूर्वीच बिबट्याच्या हल्ल्यात वाघदरा शिवारात एका शेतकऱ्याच्या
मृत्यूची झाल्याची घटना ताजी असतानाच ही दुसरी घटना घडल्यामुळे जिल्ह्यात
भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर नितेश राणेंची शेलक्या शब्दात टीका

आजी-आजोबांसमोरच स्वराजचा बिबट्यानं घेतला जीव

धक्कादायक म्हणजे आजी-आजोबांसमोरच स्वराजचा बिबट्यानं जीव घेतला आहे.
स्वराज सुनील भापकर असं १० वर्षीय मृत मुलाचं नाव आहे.
वनविभागानं बिबट्याला तात्काळ जेरबंद करावे, अशी मागणी केली जात आहे. या
घटनेमुळे आष्टीसह पाटोदा, शिरूर तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झालं
आहे.

अशी घडली घटना

मिळालेली
माहितीनुसार, किन्ही गावातील स्वराज सुनील भापकर हा शुक्रवारी दुपारी १२
वाजून ३० मिनिटांच्या सुमारास आजी-आजोबांसोबत शेतात गेला होता. मात्र,
बिबट्या झुडपात दबा धरून बसलेला होता. झुंडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने
अचानकपणे स्वराजवरती हल्ला चढवला आणि उचलून नेले. त्याच्या आजी-आजोबांनी
मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर इतर गावकऱ्यांनी शेतात धाव घेतली. त्यानंतर
वन विभागाचं पथक देखील घटनास्थळी दाखल झालं. पथक आणि गावकऱ्यांनी स्वराजचा
शोध घेतला असता झाडाझुडपात त्याचा मृतदेह आढळून आला.

नागनाथ यांच्यावरही अचानकपणे चढवला बिबट्याने हल्ला

सदर
घटना ही बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सुर्डी या ठिकाणी घडली आहे.
सुर्डी येथील शेतकरी नागनाथ गहिनिनाथ गर्जे हे गावाजवळच्या वाघदरा या शेतात
तुरीला पाणी देण्यासाठी गेले होते. पाणी देत असताना बिबट्याने अचानकपणे
नागनाथ गहिनीनाथ गर्जे त्यांच्यावर हल्ला चढवला. यात त्यांचा जागीच मृत्यू
झाला. दुपारपासून गेलेले नागनाथ गर्जॅ सायंकाळपर्यंत घरी परत न आल्याने
नातेवाईकांनी शेतात जाऊन पाहणी केली असता, नागनाथ गर्जे हे रक्ताच्या
थारोळ्यात पडलेले आढळून आले.

चेहरा आणि मानेवर बिबट्याचा चावा

बिबट्याच्या
हल्ला करून, नागनाथ गर्हे यांचा चेहरा आणि मान खाल्ली होती. त्याचबरोबर
सर्व चेहरा छिन्न विच्छिन्न झाला होता. आष्टी तालुक्यात बिबाट्याचा वावर
मोठ्या प्रमाणावर होत असून वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना जीव
गमवावा लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. वनविभागाने त्वरित
बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत. मयत हे
आष्टी पंचायत समितीच्या मोराळा गनाच्या पंचायत समिती सदस्या आशा गर्जे
यांचे पती आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!