फलटण तालुक्यासह माण व खटाव तालुक्यात ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची निर्मिती करा; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांची मागणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. २७ : सध्या फलटण, माण व खटाव तालुक्यामध्ये कोरोनाची परिस्थिती हि अत्यंत गंभीर बनत चाललेली आहे. फलटण, माण व खटाव तालुक्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी व फलटण, माण व खटाव तालुक्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांना तातडीने उपचार मिळण्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माण – खटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक आयोजित केलेली होती. त्या वेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माण – खटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांनी फलटण, माण व खटाव तालुक्यामधील कोरोना बाधित रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून फलटण तालुक्यासह माण व खटाव तालुक्यात ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची निर्मिती करण्यात यावी अशी आग्रही मागणी केली.

फलटण, माण व खटाव तालुक्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या दालनात आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली होती. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, सिव्हिल सर्जन सुभाष चव्हाण, आपत्कालीन समितीचे ताम्हणकर, निवासी उपजिल्हाधिकारी थोरवे, भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, भाजपा जिल्हा सरचिटणीस विठ्ठलशेठ बनशेट्टीवार, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, फलटण नगर परिषदेचे नगरसेवक अशोक जाधव,‌ युवा नेते अभिजीत नाईक निंबाळकर, सातारा तालुका अध्यक्ष राजेंद्र इंगळे, सरचिटणीस राहुल शिवनामे, वैद्यकीय सेवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष आप्पा कदम, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष नानासो इवरे, विधितज्ञ् सचिन शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

फलटण तालुक्यासह माण व खटाव तालुक्यात रेमडीसीव्हर इंजेक्शन हे कमी प्रमाणात येत आहेत. सातारा जिल्ह्यातील इतर तालुक्याला ज्या प्रमाणात रेमडीसीव्हर इंजेक्शनचे वाटप होत आहे. तेवढ्याच प्रमाणात फलटण तालुक्यासह माण व खटाव तालुक्यात रेमडीसीव्हर इंजक्शनचे वाटप करण्यात यावे, अशी आग्रही मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या वेळी केली.

खाजगी डॉक्टर हे शासकीय नियमापेक्षा अधिक प्रमाणात बिले आकारून सर्वसामान्य नागरिकांनी लूट करीत आहेत. तरी सातारा जिल्ह्यातील सर्व हॉस्पिटलची बिले तपासण्यासाठी शासकीय ऑडिट करणे आवश्यकी आहे. आगामी काळामध्ये जादा बिले आकारणाऱ्या हॉस्पिटलवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार जयकुमार गोरे यांनी या वेळी केली.

फलटण शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या उत्कर्ष लॉज येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून कोरोना केअर सेंटरची उभारणी होत आहे. फलटण तालुक्यामध्ये नागरिकांना सद्य परिस्थितीमध्ये बेड्स मिळवण्यासाठी खूप कसरत करावी लागत आहे. तरी आगामी काळामध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून उभारत असलेल्या कोरोना केअर सेंटरसाठी प्रशाशकीय मान्यता हि जलद गतीने मिळण्यात यावी अशी मागणी या वेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी केली.


Back to top button
Don`t copy text!