उद्याोजक सचिन यादव यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २६ डिसेंबर २०२१ । फलटण । के. बी. उद्योग समुहाचे संचालक व शिल्पकार सचिन यादव यांचा वाढदिवस शुक्रवार, दि. २४ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. सचिन यादव यांच्या वाढदिवसानिमित्त के. बी. उद्योग समुहाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

के. बी. उद्योग समुहाच्या वतीने कंपनीच्या प्रांगणात रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आलेले होते. सचिन यादव यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे येथील सुप्रसिद्ध डान्स अकॅडमीच्या कलाकारांनी विविध नृत्याविष्कार यावेळी सादर करण्यात आले.

के. बी. उद्योग समुहाचे संचालक व शिल्पकार सचिन यादव यांना सामाजिक, कृषी, राजकीय यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!