जटिल करप्रणाली समस्यांकरिता ईएमएसएमईचे समाधान


दैनिक स्थैर्य । दि. १२ मी २०२२ । मुंबई । ईएमएसएमई हे भारतातील आघाडीचे नेक्स्ट-जनरेशन व्यासपीठ आहे, जे एमएसएमईंच्या आर्थिक, कर आकारणी व अनुपालन आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी एक-थांबा सोल्यूशन्स देते. २२ डिसेंबर २०२० रोजी स्थापना करण्यात आलेल्या कंपनीचा एमएसएमईंमध्ये (मायक्रो, स्मॉल अॅण्ड मेडियम एंटरप्राईजेज) आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा आणि त्यांना डिजिटल, विश्वसनीय व बँकेबल करण्याचा मनसुबा आहे. कंपनीचे वैविध्यपूर्ण कर्मचारी आहेत, जे संभाव्य समाधनाच्या माध्यमातून जटिल समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतात.

एमएसएमईंना दर्जेदार सेवांची गरज आहे, ज्या त्यांना त्यांच्या कर आकारणी, आर्थिक व अनुपालन समस्यांचे निराकरण करण्यामध्ये मदत करतील आणि ईएमएसएमई ही सेवा देते. कंपनी एमएसएमईंना बाजारपेठेत स्पर्धात्मक विस्तार संपादित करण्यामध्ये सक्षम करणा-या एकाच एकीकृत व्यासपीठाच्या माध्यमातून अशा क्षेत्रांमध्ये व्यापक सेवा देते. व्यासपीठ एमएसएमईंना त्यांचे कर प्रभावीपणे नियोजन करण्यास प्रेरित करण्यासाठी किफायतशीर व डिजिटल सोल्यूशन्स देते. ईएमएसएमई लघु व मध्यम व्यवसायांना त्यांच्या कपात केलेल्या करांचा दावा करण्यास मदत करण्यासाठी आयकर भरण्याबद्दल जागरूकता निर्माण करण्याप्रती कटिबद्ध आहे. कंपनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी यूआरसीची नोंदणी करणे देखील सुलभ करते आणि शुल्क व दंड भरण्याला होणारा विलंब टाळण्यासाठी व्यवसायांमध्ये शिस्तबद्धता आणते.

ईएमएसएमईने अंदाज लावता येण्याजोगे, मापनीय उत्पादन आणि किंमतीचा शोध घेणा-या व्यासपीठासह एक अद्वितीय व्यवसाय मॉडेल स्वीकारले आहे. आज, हे सरकारी योजनांचा शोध आणि भविष्यातील तंत्रज्ञानाच्या शक्तिशाली संयोजनासह एकात्मिक एंटरप्राइझ इकोसिस्टमवर एक अद्वितीय व्यासपीठ म्हणून उदयास आले आहे. हे वैशिष्ट्यपूर्ण घटक ईएमसएमईला प्रतिस्पर्धींपेक्षा वरचढ ठरण्यामध्ये साह्य करतात.

तंत्रज्ञान आणि नवोन्मेष्‍काराच्या सहाय्याने अपवादात्मक सेवांचे उत्पादन करण्याच्या व्यासपीठाच्या उदात्त दृष्टीकोनाने एंजल फंडिंग राऊंडमध्ये २.५ कोटी रूपये उभारत बेंचमार्क यश मिळवण्यास मदत केली आहे. ईएमएसएमईचा अव्वल एमएसएमई नॉलेज हब बनण्याचा, तसेच आगामी वर्षांमध्ये भारतातील व इतर दक्षिण आशियाई देशांमधील एमएसएमई परिसंस्थेमध्ये प्रभावी सेवा देण्याचा दृष्टीकोन आहे.


Back to top button
Don`t copy text!