
दैनिक स्थैर्य । दि. १४ ऑगस्ट २०२२ । फलटण । स्वातंत्र्याच्या अमृत महोस्तवानिमित्त देशासह राज्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामध्येच फलटणमध्ये नगरपालिकेच्या ऐतिहासिक असे असेलेल्या इमारतीवर तिरंग्याच्या रंगात विद्युत रोषणाई केली आहे. संध्याकाळच्या वेळी हि केलेली विद्युत रोषणाई पाहण्यासाठी अनेक फलटणकर आपली उपस्थिती दर्शवत आहेत.