कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले यांची महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या प्रसिद्धी समितीच्या सदस्यपदी निवड


दैनिक स्थैर्य | दि. १९ मे २०२४ | फलटण |
पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनच्या बैठकीत विविध समित्यांच्या निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने प्रसिद्धी समितीच्या सदस्यपदी ‘आस्था टाईम्स’चे कार्यकारी संपादक तथा राष्ट्रीय खो-खो खेळाडू कृष्णात उर्फ दादासाहेब चोरले यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.

पुणे येथे महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पदाधिकार्‍यांची बैठक संपन्न झाली. यामध्ये विविध समित्या व त्यांचे अध्यक्ष, सचिव व सदस्य यांच्या निवडी महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजित जाधव यांनी जाहीर केल्या.

यामध्ये प्रसिद्धी समितीच्या अध्यक्षपदी अजित संगवे तर सचिवपदी राजेश कळंबटे यांची निवड करण्यात आली असून सदस्यपदी दादासाहेब चोरमले, भूषण कदम, महेश विचारे, संदीप बल्लाळ, प्रेमचंद चौधरी व गणेश माळवे यांची निवड करण्यात आली.

या निवडीबद्दल विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अ‍ॅड. गोविंद शर्मा आदी मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!