स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

मगरपट्टा सिटीच्या पॅटर्न प्रमाणे फलटण तालुक्यात अतिरिक्त औद्योगिक वसाहतीसाठी प्रयत्नशील : ना.श्रीमंत रामराजे

Team Sthairya by Team Sthairya
March 18, 2021
in प्रादेशिक, फलटण तालुका, फलटण शहर

स्थैर्य, फलटण, दि. 18 : पुणे येथील जगविख्यात मगरपट्टा सिटी विकसन करताना स्थानिक शेतकर्‍यांच्या भागीदारीमधून ज्याप्रमाणे औद्योगिक वसाहत उभी करण्यात आलेली आहे. त्याच धर्तीवर फलटण तालुक्यातील मिरगाव, ढवळेवाडी व नांदल या गावामध्ये अतिरिक्त औद्योगिक वसाहत उभी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

फलटण पंचायत समितीच्या सभागृहामध्ये अतिरिक्त औद्योगिक वसाहती बाबत आयोजित केलेल्या बैठकीत ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी फलटणचे – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटणचे प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहत महामंडळाचे उपविभागीय अधिकारी इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना ना.श्रीमंत रामराजे म्हणाले की, शेतकर्‍यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान न होता पुणे येथे मगरपट्टा सिटीचा ज्या प्रकारे विकास करण्यात आलेला आहे. त्याच प्रकारे फलटण येथे अतिरिक्त औद्योगिक वसाहत उभारून तालुक्यात उत्तम कंपन्या आणून रोजगारनिर्मितीसाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत. फलटण तालुक्याला कमिन्स या एका कंपनीवर अवलंबून न राहता छोट्या मोठ्या कंपन्याही या ठिकाणी सुरू होणे गरजेचे आहे. आगामी काळामध्ये साकारत असलेल्या अतिरिक्त औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या कंपन्यांबरोबरच स्थानिक व्यवसायिकांना परिपूर्ण सुविधा देऊन व्यवसाय वाढीसाठी व आर्थिक उन्नतीसाठी आपले विशेष प्राधान्य राहणार असल्याचेही, नर,श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

औद्योगिक वसाहत उभारताना त्या ठिकाणच्या जमिनीला शेतकर्‍यांचा योग्य मोबदला मिळावा यासाठी ना.श्रीमंत रामराजे यांनी प्रयत्न करावेत या शेतकर्‍यांच्या मागणीवर बोलताना, औद्योगिक वसाहतीमध्ये जाणार्‍या जमिनींना बाजार भावापेक्षा नक्कीच ज्यादा दर देण्यात येईल, अशी ग्वाही ना.श्रीमंत रामराजे यांनी उपस्थित शेतकर्‍यांना दिली व प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांना याबाबतचा लेखांकित अहवाल शासनाकडे सादर करावा असे निर्देशही यावेळी दिले.

कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागामध्ये असणार्‍या नांदवळ करंजखोप येथील माळरानावर सुद्धा औद्योगिक वसाहत उभी करून येथील स्थानिकांना सुद्धा रोजगार निर्मिती करून देणार आहे. या भागाच्या जवळून म्हणजेच दहा किलोमीटर अंतरावर वरूनच आशियाई महामार्ग जात असल्याने तेथील जागांना नक्कीच मोठमोठ्या कंपन्या पसंती देतील, असेही ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.


📣 दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. दैनिक स्थैर्यच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करावे.

ADVERTISEMENT
Previous Post

संभाव्य आपत्तीवर लक्ष ठेवण्यासाठी आधुनिक सुविधायुक्त आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारण्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे निर्देश

Next Post

नारवट येथील वनपर्यटन केंद्राचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करा – पालकमंत्री अशोक चव्हाण

Next Post

नारवट येथील वनपर्यटन केंद्राचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करा – पालकमंत्री अशोक चव्हाण

ताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा

Join 1,033 other subscribers

जाहिराती

ताज्या बातम्या

वाढत्या मागणीमुळे अन्य राज्यांमधून सुमारे ५०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

April 21, 2021

नाशिक वायुगळतीमुळे झालेल्या प्राणहानीबद्दल राज्यपालांना दुःख

April 21, 2021

दिनांक 20 एप्रिल रोजी शासनाने जाहीर केलेला लस घेतलेल्या लोकांचा डाटा खूपच बोलका आहे.

April 21, 2021

फलटण तालुक्यातील २१७ तर सातारा जिल्ह्यातील १६९५ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित;  ३७ बाधितांचा मृत्यु

April 21, 2021

‘चिंगारी’च्या मराठी मनोरंजनात आणखी भर

April 21, 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्बंध अधिक कडक करणार, अंमलबजावणी आराखडा सज्ज ठेवा

April 21, 2021

वैद्यकीय ऑक्सिजन उत्पादन वाढवण्यासाठी ‘एमजी मोटर इंडिया’चा पुढाकार

April 21, 2021

नाशिक महापालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीची घटना दुर्दैवी; मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदना – उपमुख्यमंत्री अजित पवार

April 21, 2021

महाराष्ट्र शोकमग्न आहे! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

April 21, 2021

फिनटेकमुळे बदलतोय शेअर बाजाराचा चेहरा

April 21, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

कॉपी करू नका.