ईडीची नोटीस गांभीर्याने घेण्याची गरज नाही, आजकाल कोणालाही येते; प्रफुल्ल पटेल यांचा टोला

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

स्थैर्य, नागपूर, दि.२८: भारतात अनेकांना ईडीची नोटीस येत असते. त्यात काही नवीन नाही. ईडीची नोटीस येणे खूप स्वस्त झाली असून आजकाल कुणालाही नोटीस बजावल्या जाते, असा टोला राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी लगावला.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीकडून आलेल्या नोटीशीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. ईडीच्या नोटीसमध्ये काहीच नवीन नाही. भारतात अनेकांना ईडीच्या नोटीस येतात. ईडीची नोटीस येण्याचे कोणालाही वाईट वाटत नाही. कारण आजकाल कोणालाही नोटीस बाजवली जाते, मग त्या व्यक्तीचा संबंध असो वा नसो, असा टोला प्रफुल्ल पटेल यांनी हाणला. ईडीच्या नोटीसला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. कोणी चुकीचे केले असेल तर बाहेर येईल. यात राजकारण आहे का हे ही त्यामुळे दिसून येईल, असेही ते म्हणाले.

Back to top button
Don`t copy text!