दैनिक स्थैर्य । दि. ०२ ऑगस्ट २०२२ । फलटण । दुधेबावी गावाच्या हद्दीत दडस वस्ती येथे बिरोबा मंदिरासमोर पती गणेश वामन एकळ ह्यास तिसरे लग्न करीत असताना आढळुन आले असताना सासर घरातील लोकांनी व इतर अनोळखी व्यक्तींनी मारहाण व शिवीगाळ दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देत फिर्यादी व फिर्यादीच्या भावास मारहाण केली असल्याची तक्रार फिर्यादी किर्ती गणेश एकळ, वय ३१ वर्षे, रा. नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापुर यांनी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडून मिळालेली माहिती अशी की, दुधेबावी गावाच्या हद्दीत बिरोबा मंदिरासमोर बेकायदा बिगर परवाना जमाव जमवुन फिर्यादी किर्ती गणेश एकळ यांच्या सासरच्या घरातील विकास वामन एकळ, गणेश वामन एकळ, संगीता विकास एकळ, कांताबाई वामन एकळ, डॉ. एकळ (पूर्ण नाव माहित नाही), सर्व राहणार दुधेबावी ता. फलटण, रोहिणी दत्तात्रेय गंगाने, रा. उंचगाव ता. जि. कोल्हापूर व इतर अनोळखी दहा ते बारा लोक हातात लोखंडी पाईप, दगड, पट्टा, काठी घेऊन येऊन मारहाण करून शिवीगाळे दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्या भांडणांमध्ये फिर्यादीचा भाऊ भानुदास उराडे यास डोकीत मार लागला. चुलत भाऊ हेमंत उराडे, तुकाराम उराडे, आई लोचना उराडे, चुलती लता उराडे यांना सुद्धा मारहाण करून जखमी केले आहे. फिर्यादीस मारहाण करून अंगावरील टॉप फाडला आहे. तसेच सदर भांडणात फिर्यादीच्या पायातील जोडवी मोबाईल गळ्यातील सोन्याची चैन गाळ झाली आहे. अश्या आशयाची तक्रार फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार खाडे करित आहेत.