सह्याद्री कदम श्रीमंत रामराजेंच्या भेटीला; तालुक्यात विविध चर्चांना उधाण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०२ ऑगस्ट २०२२ । फलटण । माजी आमदार स्व. चिमणराव कदम यांचे सुपुत्र सह्याद्री चिमणराव कदम हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची फलटण येथे भेट घेतली आहे. सुमारे एक तास कमराबंद चर्चा झाल्याने तालुक्यात विविध चर्चांना उधाण आले आहे.

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील “लक्ष्मी – विलास” या निवासस्थानी माजी आमदार स्व. चिमणराव कदम यांचे सुपुत्र व फलटण तालुक्याचे युवा नेते सह्याद्री कदम यांनी भेट घेतली. यामुळे फलटण तालुक्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलेले आहे.

जिल्हा परिषद व पंचायतीच्या निवडणूका ह्या आगामी काही दिवसांवर येवुन ठेपल्या आहेत. त्यामध्येच युवा नेते सह्याद्री कदम यांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेतल्याने तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीची राजकीय समीकरणे बदलणार का ? असा सवाल उपस्थित राहत आहे. गत काही महिन्यांपासून सह्याद्री कदम यांनी फलटण तालुक्यात गाठी – भेटीचा सिलसिला सुरू केला आहे. आगामी जिल्हा परिषदेसाठी सह्याद्री कदम हे निवडणूक लढवुन तालुक्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा सक्रीय होणार असल्याचे चित्र तयार होत होते. परंतु कोळकी जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्याने जर जिल्हा परिषदेमध्ये जायचे असेल तर त्यांना अन्य गट शोधावा लागणार आहे. या सर्व प्राश्वभुमीवर सह्याद्री कदम यांनी घेतलेली श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची भेट ही महत्त्वाची मानली जात आहे.

याबाबत आम्ही सह्याद्री चिमणराव कदम यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भगीनी यांचे नुकतेच निधन झाल्याने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे सांत्वनपर भेटीसाठी गेलेलो होतो. पुणे येथे भेटीसाठी जाण्याचे नियोजित होते परंतु पुणे येथे जावु न शकल्याने फलटणमध्येच भेट घेतली. यावेळी आमच्या कुटुंबातील सदस्य सुध्दा उपस्थित होते. सांत्वनपर भेटीसाठी गेल्याने इतर चर्चेचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!