
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २८ ऑगस्ट २०२२ । फलटण । गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांनी गणपती बसवण्यासाठी शेड उभे करण्यास लगबग सुरू केली आहे. तर कुंभार वाड्यात गणेशमूर्तींना सजवण्याच्या कामालाही गती आली आहे. गणेश मूर्ती बुकिंग करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते व नागरिक कुंभारवाड्यात जाऊन लागले आहेत.
गेली दोन वर्षे कडक निर्बंध लागू होते. पण ह्यावर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव पार पडणार आहे. यंदा गणेश मूर्तीची किंमत कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती आणि महागाई यामुळे वाढलेल्या किमती मध्ये वाढ झालेली आहे.
