दैनिक स्थैर्य । दि. १२ जून २०२३ । पुणे । पर्यावरण शास्त्राच्या विभाग प्रमुख* सौ डॉ विजयालक्ष्मी राजीव शिंदे अबेदा इनामदार सीनियर कॉलेज कॅम्प, पुणे यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून नुकतीच पर्यावरणशास्त्रातील *पी.एचडी.* जाहीर झाली. त्यांचा संशोधन विषय हा ” इकॉलॉजिकल असेसमेंट ऑफ अर्बन ग्रीन स्पेसेस अँड इट्स पोटेन्शियल फोर प्रोवायडींग इकॉलॉजिकल सर्विसेस विथ स्पेशल रेफरन्स टू कार्बन सिक्वेस्ट्रेशन पोटेन्शिअल”.
यासाठी यांना डॉक्टर ज्ञानेश्वर महाजन व डॉक्टर व्ही. आर. गुणाले सर आणि प्राचार्य डॉक्टर शैला बूटवाला यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर घरातील स्मृतिगंध शारदाताई अंबादास शिंदे व अंबादास सैदु शिंदे, डॉक्टर विजय दत्तात्रय महिंद्रकर व डॉक्टर शामला महिंद्रकर यांचे अनमोल सहकार्य व आशीर्वाद लाभले. यापूर्वी त्यांनी पर्यावरण विषयातच नैपुण्य प्राप्त करत त्यांनी एम. एस. सी.M.Sc पर्यावरण शास्त्र मध्ये विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या.
इतर शैक्षणिक प्राविण्य खालील प्रमाणे:
SET व UGC-NET
Diploma in Environmental Management and ISO 14000.पर्यावरण नियोजन व व्यवस्थापन ISO-14000)
Diploma in Pollution Control.प्रदूषण नियंत्रण
Expert in Environmental Auditपर्यावरणातील लेखापरीक्षण
पर्यावरण शास्त्रातील एम. फिल डिग्री प्राप्त केलेले आहे.
पर्यावरण विषयासाठी व्हीसी नॉमिनी म्हणून फर्ग्युसन कॉलेज येथे नेमणूक करण्यात आली आहे.
पर्यावरण शास्त्रातील पुस्तके प्रकाशित.
पर्यावरण विषयावर संशोधन पेपर* प्रकाशित.
आदर्श प्राध्यापिका म्हणून सर्वपल्ली राधाकृष्णन पुरस्काराने सन्मानित.
2014 मध्ये भारतातील पर्यावरणासाठी स्वतंत्र विद्यापीठ मागणी करणाऱ्या डॉक्टर विजयालक्ष्मी राजीव शिंदे या आहेत.
पर्यावरण विषयातील पीएचडी प्राप्त केल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे तसेच चैतन्य हास्ययोग धानोरी यांच्यातर्फे देखील त्यांचा सत्कार करण्यात आला.