फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा! डॉ. तनुजा आहेरराव यांचे घवघवीत यश; कु. सिद्धाली शहा यांच्याकडून सन्मान व शुभेच्छा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या मास्टर ऑफ फिजिओथेरपी परीक्षेत डॉ. तनुजा आहेरराव यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या यशाबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

स्थैर्य, फलटण, दि. 03 ऑक्टोबर : पुणे येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून ‘मास्टर ऑफ फिजिओथेरपी’ (Master of Physiotherapy) या पदव्युत्तर पदवी परीक्षेत संपूर्ण विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल फलटणच्या सुकन्या डॉ. तनुजा राजेंद्र आहेरराव यांचा फलटण नगरपरिषदेच्या नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा यांनी विशेष सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

८० टक्के गुणांसह मिळवले दैदिप्यमान यश:

डॉ. तनुजा राजेंद्र आहेरराव यांनी नुकत्याच झालेल्या मास्टर ऑफ फिजिओथेरपी या अत्यंत आव्हानात्मक परीक्षेत तब्बल ८० टक्के इतके घसघशीत गुण प्राप्त करून विद्यापीठ स्तरावर पहिला क्रमांक मिळवण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्यांच्या या घवघवीत यशामुळे फलटणच्या शैक्षणिक आणि वैद्यकीय लौकिकात मोठी भर पडली असून, सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

फलटणकरांसाठी अभिमानास्पद क्षण:

डॉ. तनुजा यांच्या या मोठ्या यशाची दखल घेत नगरसेविका कु. सिद्धाली शहा यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचा यथोचित सन्मान केला. या सत्कारप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना कु. सिद्धाली शहा म्हणाल्या की, “डॉ. तनुजा आहेरराव यांना मिळालेले हे घवघवीत यश म्हणजे फलटणच्या शिरपेचात खोवलेला एक मानाचा तुरा आहे. त्यांनी अत्यंत कष्टाने आणि जिद्दीने मिळवलेले हे विद्यापीठ स्तरावरील यश संपूर्ण फलटणकरांसाठी खऱ्या अर्थाने खूप अभिमानास्पद आहे.”

यावेळी कु. सिद्धाली शहा यांनी डॉ. तनुजा आहेरराव यांचे या अद्वितीय यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले आणि त्यांच्या वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील पुढील उज्ज्वल वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!