झैनबिया स्कूलच्या वतीने घर घर तिरंगा रॅली

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. ११ ऑगस्ट २०२२ । बारामती । भारत देशाच्या अमृत महोत्सव वर्षा निमित्त “हर घर तिरंगा” अभियान जन जागृतीसाठी झैनबिया स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तिरंगा झेंडा घेऊन रॅली कटफळ मध्ये रॅली काढण्यात आली.
विद्यार्थ्यां व शिक्षक यांनी गावातून देशभक्तीवर घोषणा,देत रॅली काढून गावातील लोकांची जनजागृती केली. प्रभात फेरीचा प्रारंभ प्राचार्या इन्सिया नासिकवाला यांच्या हस्ते करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी कटफळ गावातून काढलेल्या प्रभात फेरीने गावात देशभक्तीचे वातावरण तयार झाले होते. प्रभात फेरीचे आयोजन शाळेचे क्रीडाशिक्षक आप्पासाहेब देवकाते , विशाल हाडंबर व कोमल बोराटे यांनी केले.

Back to top button
Don`t copy text!