सिंड्रेला नको, सायबरेला हवी – डॉ. शशी बाला सिंग


दैनिक स्थैर्य । दि. ०७ जानेवारी २०२३ । नागपूर । तंत्रज्ञान महिला आणि मुलींसाठी गेम चेंजर ठरू शकते. विशेषत: दुर्गम आणि किरकोळ भागात तंत्रज्ञानामुळे महिला सक्षमीकरणात नक्कीच मदत होऊ शकते. त्यामुळे आम्हाला सिंड्रेला नको, तर महिला सबलीकरण आणि विकासासाठी ‘सायबेरेला’ हवी आहे, असे प्रतिपादन डॉ. शशी बाला सिंग, संचालक, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (NIPER), हैदराबाद यांनी केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आयोजित 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या चौथ्या दिवशी ‘ग्रामीण महिलांच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी तांत्रिक सक्षमीकरण’ या विषयावर चर्चासत्र पार पडले. या विषयावर सविस्तर माहिती देताना डॉ. शशी बाला म्हणाले की, भारत हा 140 कोटी लोकसंख्येचा देश असून त्यापैकी निम्म्या महिला आहेत. राष्ट्राच्या विकासासाठी या मानव संसाधनाचा वापर करणे आवश्यक आहे.

डॉ. वंदना बी. पत्रावळे, फार्मास्युटिकल सायन्सेस आणि टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई, यांनी ‘पर्क्यूटेनियस कोरोनरी स्टेंट्स: फ्रॉम बेंच टू बेडसाइड’ या विषयावर मार्गदर्शन केले. संचालन डॉ.श्रद्धा जोशी यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!