शेतकर्‍यांकडून डीपीसाठी पैसे घेऊ नका; शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे बारामती विभागीय कार्यालयाकडून फलटण वीज वितरण कार्यालयाला आदेश


 

स्थैर्य, फलटण, दि.२५: फलटण तालुक्यात वीज वितरण विभागाचे डी.पी. चोरीला जाण्याचे अथवा नादुरुस्त होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत असतानाच डी.पी. पुन्हा बसवण्यासाठी महावितरण शेतकर्‍यांकडून अनाधिकृतपणे पाच हजार रुपयांपर्यंत वीजबिल भरण्यासाठी सांगत असल्याची बाब लक्षात आल्यानंतर याकडे बारामती वीज महावितरण विभगाचे मुख्य अभियंता सुनिल पावडे यांचे लक्ष वेधल्यानंतर शेतकर्‍यांकडून अशापद्धतीने पैसे घेऊ नका असे सक्त आदेश फलटण उपविभागीय महावितरण कार्यालयाला दिले असल्याची माहिती शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदीप झणझणे यांनी दिली.

डिपी बसवण्यासाठी यापुढे कोणीही अनधिकृतपणे पैसे देऊ नयेत. शेतक-यांनी याबाबत जागरुक रहावे. वीज महावितरणने विनामूल्य डिपी बसवणे बंधनकारक आहे. जर वीज महावितरणच्या अधिकारी वा कर्मचारी यांचेकडुन कोणी पैशाची मागणी केली तर माझ्याकडे 8600138961 किंवा 7774096430 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही झणझणे यांनी शेतकर्‍यांना केले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!