स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

‘आम्हाला कडक निर्बंध लावण्यास भाग पाडू नका’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हॉटेल चालकांना दिला शेवटचा इशारा

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हॉटेल, उपहारगृह आणि मॉलच्या प्रतिनिधींची ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
March 13, 2021
in प्रादेशिक

स्थैर्य, मुंबई, दि. १३ : राज्यभरात कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात नव्याने सापडलेल्या कोरोना रुग्णांमध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे राज्य सरकार आणि आरोग्य प्रशासनाची चिंता वाढलेली आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हॉटेल, उपहारगृह आणि मॉलच्या प्रतिनिधींसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कडक निर्बंध लावण्याचा इशारा दिला आहे.

नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन, शॉपिंग सेन्टर्स असोसिएशन यांच्या प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. तसेच त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, 4 महिन्यात सर्व व्यवस्थित होत होते. आपल्याच राज्यात नव्हे तर अगदी युरोपमध्ये सुद्धा जणू काही कोरोना गेल्यासारखे सर्व व्यवहार मोकळेपणाने सुरु झाले होते. मात्र अचानक सर्वत्रच संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून तिकडे ब्राझीलमध्ये भयानक स्थिती झाली आहे. आपल्याला युरोपसारखी परिस्थिती होऊ द्यायची नसेल तर काटेकोरपणे आरोग्याचे नियम पाळावे लागतील.

कोविडचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी हॉटेल्स, उपाहारगृहे यांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केले. तसेच लॉकडाऊन करून सगळं बंद करणे आम्हालाही नकोय पण मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे अशा नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असून आम्हाला कडक निर्बंध लावण्यास भाग पडू नका, असे ते यावेळी म्हणाले.

स्वयंशिस्त खूप महत्त्वाची
पुढच्या काळात देखील आपल्याला कोविडबरोबरच जगायचे असून जीवनपद्धती त्याला अनुरूप करावी लागेल. बंदी आणि स्वयंशिस्त यात फरक असून सर्वांनी याचे भान ठेवावे असेही ते म्हणाले. मागील वर्षी विशेषत्वाने झोपडपट्टीत मोठ्या प्रमाणावर संसर्ग दिसू लागला होता. यावेळी मात्र तो इमारती, बंगले, सोसायट्यांमध्ये दिसतो आहे. याचे कारण म्हणजे समाजातील या वर्गाचे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना भेटणे, हॉटेलिंग, मॉल्समध्ये जाणे सुरु झाले आहे, त्यामुळे परिवारातल्या सर्व सदस्यांत एकदम फैलाव होत आहे.

मागील आठवड्यात केंद्रीय पथक मुंबईत आले असता एका हॉटेलमध्ये कोणत्याही कर्मचाऱ्यांनी मास्क न घातलेला व सुरक्षित अंतर न पाळता गर्दी झाल्याचा अनुभव आला असल्याचे त्यांनी आपणास सांगितले. हॉटेल्स आणि उपाहारगृहे हे भेटीगाठी व जेवण-नाश्त्याचे प्रमुख ठिकाण असून सुरुवातीच्या काळात नियमांचे पालन होताना दिसत होते. हॉटेल्समध्ये समोरासमोर न बसवता सुरक्षित अंतर ठेऊन बसविणे, वेटर्स आणि इतर कर्मचारी यांनी मास्क घालणे, जंतुनाशक फवारणी असे होत होते. पण राज्यभरात आता काही हॉटेल्स, मॉल्स, उपाहारगृहांत नियमांची पायमल्ली होऊन वातावरण सैल झाल्यासारखे प्रशासनाला दिसत आहे. अजूनही परिस्थिती आपल्या हातात आहे, आपण स्वत:हून आमच्या एसओपीचे पालन नीट व काटेकोरपणे झालेच पाहिजे हे पहा. सर्वजण नियम धुडकावत आहेत असे नाही, पण काही नियम न पाळणाऱ्यांमुळे धोका वाढतोय असेही ते म्हणाले. लॉकडाऊन लावून सगळे बंद करणे आम्हालासुद्धा आवडत नाही. आपण हे अर्थचक्र सुरु केले आहे, सर्वांनी सहकार्य केले तर संसर्ग रोखता येईल, त्यामुळे लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध लावण्यास भाग पडू नका, असेही मुख्यमंत्री म्हणाले.


📣 दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. दैनिक स्थैर्यच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करावे.

ADVERTISEMENT
Previous Post

एटीएम कार्डची अदलाबदल करीत फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश … !

Next Post

विमान प्रवास करणाऱ्यांसाठी नव्या गाइड लाइन : प्रवास करताना पूर्णवेळ घालावे लागेल मास्क

Next Post

विमान प्रवास करणाऱ्यांसाठी नव्या गाइड लाइन : प्रवास करताना पूर्णवेळ घालावे लागेल मास्क

ताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा

Join 1,033 other subscribers

जाहिराती

ताज्या बातम्या

दिनांक 20 एप्रिल रोजी शासनाने जाहीर केलेला लस घेतलेल्या लोकांचा डाटा खूपच बोलका आहे.

April 21, 2021

फलटण तालुक्यातील २१७ तर सातारा जिल्ह्यातील १६९५ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित;  ३७ बाधितांचा मृत्यु

April 21, 2021

‘चिंगारी’च्या मराठी मनोरंजनात आणखी भर

April 21, 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्बंध अधिक कडक करणार, अंमलबजावणी आराखडा सज्ज ठेवा

April 21, 2021

वैद्यकीय ऑक्सिजन उत्पादन वाढवण्यासाठी ‘एमजी मोटर इंडिया’चा पुढाकार

April 21, 2021

नाशिक महापालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीची घटना दुर्दैवी; मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदना – उपमुख्यमंत्री अजित पवार

April 21, 2021

महाराष्ट्र शोकमग्न आहे! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

April 21, 2021

फिनटेकमुळे बदलतोय शेअर बाजाराचा चेहरा

April 21, 2021

रक्तदान हेच श्रेष्ठ दान : श्रीमंत संजीवराजे

April 21, 2021

कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी लवकरच सिटीस्कॅन मशिन उपलब्ध करून देणार – श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर

April 21, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

कॉपी करू नका.