स्थैर्य, सातारा, दि.२३: कोयना धरणात सध्या 92.38 टीएमसी (87.77 %) पाणीसाठा आहे. सध्या कोयना धरणातून कोयना नदी पात्रात 55 हजार 900 क्युसेक्सने विसर्ग चालू आहे. सध्या हाच विसर्ग चालू राहील. विसर्गात वाढ करण्याचे नियोजित नाही. जरी विसर्गात काही बदल झाला तरी पूर्वसूचना देण्यात येईल. तरी कृपया कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन कृष्णा खोरे विकास महामंडळ अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले यांनी केले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सांगलीसह महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे लोकांच्या मनातील गेल्यावर्षीच्या भयावह पुराच्या आठवणी ताज्या होत आहेत. यामुळे लोकांच्या नजरा सतत पाणीपातळीकडे लागल्या आहेत.
छत्रपती संभाजीराजे यांनी साधला फलटण क्रांती मोर्चा समन्वयकांशी संवाद