आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार दीपक ताटपुजेंचा सन्मान

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा, दि.29 ऑक्टोबर : इंटरनॅशनलकौन्सिल फॉर स्मॉल बिझनेस (आयसीएसबी) वॉशिंग्टन (अमेरिका) या 70 वर्ष जुन्या आंतरराष्ट्रीय संस्थेने जगातील सहा सर्वोत्कृष्ट उद्योजकीय शिक्षणतज्ज्ञांची नुकतीच निवड केली आहे. यामध्ये सातार्‍याच्या विद्यादीप फाउंडेशनचे संस्थापक व शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. दीपक ताटपुजे यांचा समावेश केला आहे. डॉ. ताटपुजे यांच्यासह प्रा. जाणिना सुंदरमायर (जर्मनी), डॉ. वाडे हाल्वोर्सन (ऑस्ट्रेलिया), डॉ. नवीन शलाबी (इजिप्त), प्रा. मारिओ कार्रासी (इटली) आणि डॉ. आश्रफ शेटा (इजिप्त) यांचा समावेश आहे.

उद्योजकीय शिक्षण क्षेत्रातील डॉ. ताटपुजे यांच्या ग्रामीण भागातील उद्योजकीय प्रसाराचे कार्य आणिआंतरराष्ट्रीय स्तरावरील केलेल्या संशोधनाचा विचार करून ही निवड करण्यात आली आहे. कैरो (इजिप्त) या ठिकाणी नोव्हेंबरमध्ये होणार्‍या ’उद्योजकीय आणि लघुउद्योग काँग्रेस’ या जागतिक परिषदेत या सहा व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार असून, जागतिक पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे. आयसीएसबी, वॉशिंग्टन या जागतिक संस्थेने अत्यंत सुप्रतिष्ठेच्या ’वैश्विक उद्योजकता शिक्षणतज्ज्ञ’ निवडीसाठी डॉ. ताटपुजे यांनी आभार मानल्याचे विद्यादीपचे अध्यक्ष दामोदर मेढेकर आणि सचिव डॉ. विद्या ताटपुजे यांनी सांगितले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!