कोरोना बाबत गाफील राहू नका : श्रीमंत रामराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्थैर्य, फलटण, दि.१९: सध्या संपूर्ण जगामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेले आहे. फलटणमध्ये विशेषतः तरुण मंडळी बाहेर फिरताना जास्त प्रमाणात दिसत आहेत. कोरोना संपेपर्यंत आपण सर्वांनी काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे, असे मत महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले. 

फलटण येथील श्रीमंत महाराणी छत्रपती सईबाई राणीसाहेब भोसले मार्केट संकुलाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. नीता मिलिंद नेवसे, जेष्ठ नगरसेवक पांडूरंग गुंजवटे, फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर, नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, सौ. प्रगती जगन्नाथ कापसे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

फलटण शहरामध्ये सध्या भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. भुयारी गटार योजना फलटणला असावी हे स्वप्न मी नगराध्यक्ष असताना पाहिलेले असून त्याचे काम पूर्णत्वास आलेले आहे. तरी भुयारी गटार योजनेमुळे फलटणकरांना थोडासा त्रास सहन करावा लागत आहे. भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर फलटणकरांना गटार किंवा पाणीपुरवठ्यासाठी अन्य त्रास सहन करावा लागणार नाही, असेही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

महाराणी श्रीमंत छत्रपती सईबाई राणीसाहेब भोसले बाजार संकुलाचे काम चालू असल्यामुळे येथे बसणारी भाजी मंडई दुसरीकडे बसवण्यात आलेली होती. तथापि या बाजार संकुलाचे काम पूर्ण झाल्यामुळे उद्यापासून पुन्हा मूळ ठिकाणी भाजी विक्रेत्यांना बसवण्यात यावे, असे आदेशही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी नगरपालिका प्रशासनास दिले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!