डोनाल्ड ट्रम्प आक्रमक; चिनी समुद्रात अमेरिकन सैन्याच्या हालचाली


स्थैर्य, वॉशिंग्टन, दि१३: अमेरिकन हत्यारांची ताकद पाहून चीनचे राष्ट्रपती जिनपिंग हैराण झाल्याचं पाहायला मिळत आहे. अमेरिकन सैन्याची शस्त्र सामग्री पाहून ड्रॅगनच्या रेड आर्मीला घाम फुटलाय. सुपरपॉवर अमेरिकी हत्यारांच्या माहितीनं ड्रॅगन लँड चीनमध्ये चांगलाच धमाका झालाय. आतापर्यंत चीन अमेरिकेच्या नौदलाला तुच्छ लेखत होतं. मात्र, दक्षिण चीन समुद्रात चीनकडून वारंवार आव्हान दिलं जात होतं. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांची आक्रमतेमुळे चीनची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. 

चिनी तज्ज्ञ तर युद्ध झाल्यास चीनचा खात्मा होण्याची भीती व्यक्त करतायेत. अमेरिकेसोबत युद्ध तर सोडा, पण सुपरपॉवर समोरही ड्रॅगन आला, तर विध्वंस ठरलेला आहे. अमेरिकेजवळ चीनला उध्वस्त करण्यासाठी असंख्य हत्यारं आहेत. त्यामुळं चिनी समुद्रात अमेरिका पाय पसरतेय. अमेरिका सैन्य इतके विस्फोटकं घेवून तयार आहे की, त्यांना अणुबॉम्बचीही गरज पडणार नाही. सुपरपॉवर अमेरिकेची सेनाच चीनचा विध्वंस करण्यासाठी पुरेशी आहे. अमेरिकन वायूसेनेची युद्धसामग्री इतकी आहे की त्यांना चीनचा खात्मा करायला थोडाही वेळ लागणार आहे. 

जगातील सर्वात बलशाली वायुसेनेच्या ताफ्यात एकूण १३ हजार २६४ विमानं आहेत. यात फायटर जेट्सची संख्या २०८५ एवढी आहे. शॉर्ट रेंज अटॅक करणा-या युद्धविमानांची संख्या ७१५ एवढी आहे. अमेरिकन वायुसेनेकडे एकूण ५७६८ हेलिकॉप्टर्स आहेत. सामान्य दिवसांमध्ये जगभरात निर्माण केलेल्या अमेरिकेच्या धावपट्ट्यांवर ही विमानं आणि हेलिकॉप्टर्स तैनात असतात. पण, सध्या सुपरपॉवरच्या हवाईदलाचे ३ हजार हवाई योद्धे चिनी समुद्रात तळ ठोकून आहेत. हे आकडे इतर कुणी नाही, तर चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या गुप्त अहवालातूनच जगजाहीर झाले आहेत. चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांच्या मते, अमेरिकन वायुसेनेनं असं शस्त्रसामग्रीसह चीनची घेराबंदी करणं जगासाठी घातक आहे. अमेरिकेचे फायटर जेटनं आतापर्यंत चीनच्या जवळपास ६ हजार फे-या मारल्या आहेत. अमेरिकेच्या योद्ध्यांनी नुकतीच, शांघायच्या अगदी जवळून उड्डाण केली आहेत.

ज्या जेट विमानांच्या केवळ उड्डाणानं जिनपिंगची झोप उडते, त्यांचा हल्ला झाल्यास चीनची किती अडचण होईल, हे समजणं अवघड नाही. त्याचवेळी अमेरिकेच्या युद्धनौकांनीही चीनची भीती वाढवली आहे. चिनी समुद्रात अमेरिकेच्या ताफ्यात ६० युद्धनौका आहेत. यातील एकट्या अमेरिकेच्या मस्टिननं चीनच्या नौसेनेत धडकी भरवली आहे. सुपरपॉवरच्या नौदलाच्या विस्फोटांना समुद्रात भरती आणलीय. तैवाननंतर फिलीपाईन्सनंही अमेरिकेसोबत युद्धाभ्यास केलाय. अमेरिकन नेवीचा युद्धसराव पाहून चीनची झोप उडालीय. त्यामुळं जो युद्धासाठी आव्हान देत होता, तोच चीन आता गपगार झालाय. चायनीज टॉप कमांडर्सनं जिनपिंगला त्यांची लायकी सांगत, मापात राहण्याचाच सल्ला दिलाय. 

आकाश असो किंवा समुद्र चीनला अमेरिकेसोबत टक्कर घेणं परवडणारं नाहीय. सुपरपॉवरच्या या दोन्ही सेनाच त्यांना सर्वात ताकदवर बनवतात. पण, एवंढ पाहूनही जर चीन गप्प राहिला नाही, तर त्यांचे काय हाल होतील? हे सांगायची गरजच नाही.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!