फलटणच्या जबरेश्वर मंदिर परिसरात डिजे किंवा साऊंड सिस्टीम वाजवू नका; पुरातत्व खात्याचे फलटण प्रशासनाला पत्र

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 14 सप्टेंबर 2024 | फलटण | भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या आखत्यारीत असलेल्या श्री जब्रेश्वर मंदिरालगतच्या रस्त्यावरून श्रीगणेश विसर्जनाच्या मिरवणुकी जात असतात. तरी सदर मिरवणुकीत साऊंड सिस्टीमचा सर्रास वापर करण्यात येतो. त्यामुळे प्रचंड ध्वनीप्रदूषण होऊन पुरातन मंदिराला हादरे बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी सदर मिरवणूक संबंधित मंदिराच्या परिसरातून जाताना साऊंड सिस्टीम बंद ठेवावेत अथवा मिरवणुकीचा मार्ग बदलण्यात यावा जेणेकरून आपला ऐतिहासिक वारसा जपण्यात येईल; असे मत भारतीय पुरातत्व खात्याच्या वतीने फलटणचे प्रांताधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी लेखी पत्राद्वारे व्यक्त केले आहे.

– नक्की काय आहे भारतीय पुरातत्व खात्याचे पत्र –


Back to top button
Don`t copy text!