डी.के.पवार यांचा वृक्षारोपणाचा उपक्रम कौतुकास्पद: रणजितसिंह देशमुख

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

वृक्षारोपण करताना व्हाईस चेअरमन डी के पवार, चेअरमन रणजितसिंह देशमुख, व्यवस्थापकीय संचालक सुंदर पाटील व इतर पदाधिकारी कर्मचारी.

स्थैर्य, फलटण दि.18 : देशाचे माजी कृषीमंत्री, ज्येष्ठ नेते खा.शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महानंदा डेअरीच्या परिसरात डी.के.पवार यांनी आयोजित केलेल्या वृक्षारोपणच्या उपक्रमामुळे महानंदा डेअरीचा परिसर पर्यावरणपूरक होऊन परिसरात शुद्ध हवेचे प्रमाण वाढेल. वृक्षारोपणातून शरद पवारांना शुभेच्छा देण्याचा डी.के.पवार यांचा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार महानंदा डेअरीचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी काढले.

मुंबई येथील महानंदा डेअरीच्या परिसरात खासदार शरद पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त महानंदा डेअरीचे उपाध्यक्ष डी.के.पवार यांच्या पुढाकारातून वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी देशमुख बोलत होते. कार्यक्रमास डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक शामसुंदर पाटील, उपव्यवस्थापक हेमंत सरदेशमुख, दूध वितरण विभागाचे प्रतिनिधी बाळू शिंदे, बाळासाहेब माने, कामगार युनियन प्रतिनिधी संजय दळवी, राजू परब, अण्णासाहेब जगन, दिनेश जोशी यांच्यासह पदाधिकारी, कर्मचार्‍यांची उपस्थिती होती.

जगामध्ये वाढते तापमान, बदलते हवामान, प्रचंड प्रमाणात होणारी  वृक्षतोड, वाढणारे प्रदूषण हे जर टाळायचे असेल तर वृक्षरोपण काळाची गरज आहे. सालाबाद प्रमाणे यंदाही वृक्षरोपण करून शरद पवार यांचा एक आदर्शवत वाढदिवस आपण साजरा करत आहोत, असे डी.के. पवार यांनी यावेळी सांगीतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केरबा डावरे व आभार प्रदर्शन राम शिंदे यांनी केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!