दिवाळीत फटाक्यांच्या धुरामुळे त्वचा पडू शकते निस्तेज; जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेल्या बचावाच्या सोप्या टिप्स

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

वाढत्या प्रदूषणामुळे त्वचेच्या बाहेरील संरक्षणात्मक थराला हानी पोहोचू शकते. यामुळे त्वचेतील ओलावा कमी होऊन त्वचा कोरडी, खरखरीत किंवा लाल पडू शकते. विशेषतः ज्यांची त्वचा संवेदनशील आहे, त्यांना खाज येणे किंवा मुरुम वाढणे यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. फटाक्यांच्या धुरामुळे त्वचेवर जमा होणारे घातक कण त्वचेचे नुकसान करतात.

स्थैर्य, सातारा, दि. ०६ नोव्हेंबर : दिवाळीच्या सणात उत्साह आणि रोषणाईसोबतच फटाक्यांमुळे होणारे प्रदूषणही वाढते. फटाक्यांच्या धुरातील बारीक कण आणि हानिकारक घटकांमुळे त्वचेचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे या दिवसांमध्ये त्वचेची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

त्वचेची काळजी घेण्याचे सोपे उपाय

त्वचेचे रक्षण करण्यासाठी एकाच वेळी अनेक उत्पादने वापरणे टाळावे. चेहरा स्वच्छ करण्यासाठी नेहमी सौम्य फेसवॉशचा वापर करावा आणि त्यानंतर योग्य मॉइश्चरायझर लावावे. चेहऱ्यावर वारंवार हात लावणे किंवा त्वचा जोरात घासणे टाळावे, जेणेकरून नैसर्गिक थर सुरक्षित राहील. घराबाहेर पडताना सनस्क्रीन लावणे विसरू नका.

घरी परतल्यानंतर घ्यावयाची काळजी

प्रदूषित वातावरणातून घरी आल्यावर चेहरा हलक्या हाताने आणि सौम्य फेसवॉशने धुवावा. तसेच फटाक्यांच्या धुराच्या संपर्कात आलेले कपडे बदलणे फायदेशीर ठरते. त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी दिवसभर पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे आणि संतुलित आहार घ्यावा. जर त्वचेवर लालसरपणा किंवा खाजेची समस्या वाढली, तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!