पंखे साफ करण्याची सोपी युक्ती; मिनिटांत दूर होईल साचलेली धूळ आणि मळ

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दिवाळीच्या साफसफाईमध्ये घरातील पंखे चकाचक करण्यासाठी काही सोप्या आणि प्रभावी पद्धती वापरता येतात, ज्यामुळे तासनतास मेहनत न घेता घर अगदी सहज स्वच्छ होऊ शकते.

स्थैर्य,सातारा, दि. ०७ नोव्हेंबर : दिवाळीच्या सणानिमित्त घरोघरी साफसफाईची लगबग सुरू असताना छतावरील पंखे स्वच्छ करणे हे अनेकांसाठी मोठे आव्हानात्मक काम असते. पंख्याच्या पात्यांवर साचलेली जाड धूळ आणि काजळी साफ करताना ती खाली अंगावर पडण्याची भीती असते. मात्र, काही सोप्या घरगुती क्लृप्त्यांचा वापर करून ही कटकट अगदी काही मिनिटांत दूर करणे शक्य आहे.

जुने कपडे आणि व्हिनेगरचा वापर

पंखे साफ करण्यासाठी जुने उशाचे कव्हर किंवा सुती कापड अत्यंत उपयोगी ठरते. पात्यावर ओले कापड किंवा व्हिनेगर व पाण्याचे मिश्रण मारल्यास साचलेला तेलकट मळ आणि धूळ एकाच झटक्यात निघून जाते. कव्हर पात्यावर घालून हळूच ओढल्यास सर्व धूळ थेट कव्हरमध्येच जमा होते, ज्यामुळे खाली कचरा पसरत नाही.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!