
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. १४ जून २०२४ | फलटण |
गंगा दशहरा पवित्र पर्वावर गिरवी (ता. फलटण) येथील गोपाळकृष्ण मंदिरात नुकताच देशातील सर्व पवित्र नद्यांच्या जलाने दिव्य कृष्ण मूर्तीस विशेष अभिषेक करण्यात आला.
याप्रसंगी नागपूर येथून थोर सत्पुरुष पू. पराग महाराज तसेच पुण्याहून ख्यातनाम संस्कृत पंडित वसंतराव गाडगीळ (वय ९४) उपस्थित होते.
यावेळी भगवंताला ५६ भोग नेवैद्य समर्पित करण्यात आला. उभय सत्पुरुष यांनी अतिव आनंद आणि समाधान व्यक्त करून साधकांनी या दिव्य स्थानी दर्शन तसेच उपासना व सेवा करून आत्म्कल्याण साधावे, असे सांगितले.
मंदिरातर्फे विद्यमान उत्तराधिकारी श्री. जयंतराव देशपांडे यांनी सर्व साधकांनी दर्शनासाठी येताना फोन (९८२३०४९०५९) वर पूर्वसूचना द्यावी, असे आवाहन केले.
