स्थैर्य, सातारा, दि. २० : कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून बुधवारी निष्पन्न झालेल्या 396 बाधितांमुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा साडेआठ हजारांच्या पुढे गेला आहे. तसेच दिवसभरात 9 जण कोरोनाबळी ठरले आहेत. याचबरोबर जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 209 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले तर 596 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला असून बुधवारी दिवसभरात नवीन 396 कोरोनाबाधित निष्पन्न झाले असून जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा 8 हजार 671 झाला आहे. तसेच दिवसभरात 9 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या 269 झाली आहे. जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 209 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्तांची संख्या 4 हजार 658 झाली आहे. याबरोबरच 596 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
विविध रुग्णालयातून आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये जावली तालुक्यातील 7., कराड तालुक्यातील 41., खंडाळा तालुक्यातील 47., खटाव तालुक्यातील 16., कोरेगांव तालुक्यातील 12., महाबळेश्वर तालुक्यातील 1., माण तालुक्यातील 6., पाटण तालुक्यातील 10., फलटण तालुक्यातील 7., सातारा तालुक्यातील 38., वाई तालुक्यातील 24 अशा एकूण 209 नागरिकांचा समावेश आहे.
9 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा बनपुरी ता. खटाव येथील 79 वर्षीय पुरुष, अपशिंगे ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, दौलतनगर सातारा येथील 36 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, शिंगणवाडी ता. कराड येथील 55 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील 63 वर्षीय महिला, एकंबे ता. कोरेगाव येथील 81 वर्षीय पुरुष अशा 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच कराड येथे खासगी हॉस्पीटलमध्ये ओंड ता. कराड येथील 65 वर्षीय पुरुष व सातारा येथील खासगी हॉस्पीटलमध्ये मायणी ता. खटाव येथील 70 वर्षीय पुरुष या 2 कोरोना बाधितांचा असे एकूण 9 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
596 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 10, वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 80, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 31, कोरेगाव 5, वाई येथील 81, खंडाळा येथील 26, रायगाव 69, मायणी येथील 101, महाबळेश्वर येथील 63, पानमळेवाडी 8, पाटण येथील 14, खावली येथील 49 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 59 असे एकूण 596 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
बाधित क्षेत्रामध्ये मायक्रो कंटेनमेंट
सातारा नगर पालिका हद्दीतील कारंजे पेठ (वरद विनायक रेसिडेन्सी), मंगळवार पेठ, गुरुवार पेठ (हनुमान मंदिर शेजारी), शनिवार पेठ (प्रथमेश गॅलेक्सि), केसरकर पेठ, सदरबाजार (शिवकृपा अपार्टमेंट), बसाप्पा पेठ (अविष्कार बांगला), गुरुवार पेठ, राजसपुरा पेठ, शनिवार पेठ, तसेच तालुका हद्दीतील नांदगाव (ग्रामपंचायत परिसर), मालगाव (खडखडी परिसर), वर्णे (टपाल वस्ती), शाहूपुरी (कारंजे तर्फ वसुंधरा गार्डन) (नंदनवन अपार्टमेंट), कोडोली (तांगडे अली), गजवाडी (गावठाण), खोंडद (मागासवस्ती), नागठाणे (पाटील वाडा परिसर), अपशिंगे (माळावरील वस्ती) या परिसरात प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे.